
दैनिक चालू वार्ता
उप संपादक उस्मानाबाद
नवनाथ यादव
उस्मानाबाद:-“कांदा मुळा भाजी अवघी |विठाबाई माझी,लसुण मिरची कोथंबिरी | अवघा झाला माझा हरि ||”वारकरी संप्रदायातील संत शिरोमणी सावता माळी यांची पुण्यतिथी भू म शहरातील समर्थ नगर येथे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे व जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ.संयोगीताताई गाढवे यांच्या हस्ते संत शिरोमणी श्री सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्त महाआरती करण्यात आली.यावेळी मा.उपनगराध्यक्षा श्रीमती सुमित्राताई माळी,युवा नेते साहिल गाढवे,राम बागडे, सुनिल माळी,बालाजी माळी,गणेश माळी,रहिमशेठ सौदागर,अभिमन्यू हावलदार,अमोल माळी,सचिन माळी,अक्षय माळी, सुरेंद्र माळी, शशिकांत माळी,देविदास माळी,रवी माळी यांच्यासह अन्य मान्यवर, भाविक भक्त समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.संत शिरोमणी सावता माळी यांनी कांदा मुळा भाजी अवघा विठाई माझी असे म्हणत त्यांना आपल्या कामातच विठोबा दिसत होता. आपल्या कामातच देव शोधण्याचा संदेश दिला आहे…