
वडगाव शाळेतील आठवीचा वर्ग झाला बंद…
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी मंठा सुरेश ज्ञा. दवणे…
जालना मंठा.केहाळ वडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा आठवीचा वर्ग बंद झाला आहे. शिक्षण विभागाकडून या शाळेत पुरेशा शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली नसल्याने पालकांनी कंटाळून या शाळेतून आपल्या पाल्यांना काढून घेतल्याची माहिती समोर आली आहे.
लोणार- मंठा महामार्गावर नायगाव टोल पासुन ६ किलोमीटर अंतरावर केहाळ वडगाव हे गाव असून, येथे आठवी वीपर्यंतचे वर्ग आहेत आणि या शाळेतील यावर्षीची पटसंख्या ६०आहे. दरवर्षी ती १०० च्या आसपास असायची. मागील दोन -तीन या शाळेत तीनच शिक्षक कार्यरत आहेत या कारणामुळे विद्यार्थीच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे गावकर्यांनी गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे शिक्षकाची मागणी केली होती परंतु शिक्षण विभागाने त्याकडे काना डोळा केल्याने शिक्षक दिले नसल्याने गावाकऱ्यांचे समाधान झाले नाही.
मुलांचे भवितव्य लक्षात घेऊन पालकांनी गावातील आठव्या
वर्गातील सत्र सुरू होताच पालकांनी विद्यार्थ्यांची टीसी काढणे सुरू केले. सातवी इयत्तेमधून पास होऊन आठव्या वर्गात विद्यार्थी गेले. त्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी टीसी काढून बाहेरील शाळेत या विद्यार्थ्यांना दाखल केले आहे. या प्रकाराने
केहाळ वडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून आठवीचा वर्ग बाद झाला आहे. पटसंख्येच्या नियमानुसार या शाळेत आणखी एका शिक्षकाची गरज आहे. शिक्षण विभागाने घडलेला प्रकार लक्षात घेऊन शिक्षकाची त्वरित नियुक्ती करणे आवश्यक आहे….