दैनिक चालू वार्ता
उप संपादक उस्मानाबाद
नवनाथ यादव
उस्मानाबाद:- गरीब कुटुंबातील शेतकरी यांची कुळाची जमीन बेकायदेशीरपणे खोटी रजिस्ट्री करून हस्तगत केल्याप्रकरणी उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी सुरवसे कुटुंबाने केली असून त्यांच्यावर झालेला खोटा गुन्हा मागे घेण्याची विनंती केली,अन्यथा 15 ऑगस्ट रोजी आत्मादहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.सविस्तर वृत्त निवेदनात असे म्हटले आहे की,नाभिक समाजातील बाबु वारीक / भगवान बाबु वारीक वारसाहक्काने रंगनाथ भगवान सुरवसे रा. दसमेगांव, ता. वाशी, जि उस्मानाबाद येथील रहिवाशी असुन ते सन १९५५ ते आजतागायत कसत असलेली जुना सर्व्हे नं. ५४ गट नंबर २३८ मधील क्षेत्र १ हे. ५२ आर व गट नं. २३६ मधील क्षेत्र ३ हे. ६१ आर या जमिनीवर बेकायदेशीरपणे रजिस्ट्री करून दि. ३ जुलै २०२३ रोजी फेरफारला नोंद घेण्यात आलेली आहे. सदर प्रकरण सौ. स्वाती नानासाहेब वाघमारे व बालाजी महारुद्र वाघमारे रा. झिन्नर सन्जा गोजवडा, ता. वाशी, जि. उस्मानाबाद यांनी संगणमताने व तहसिल कार्यालय वाशी येथील संबंधीत सरकारी कर्मचारी चंद्रकांत कदम यांना हताशी धरून रंगनाथ भगवान सुरवसे यांची खोटी रजिस्ट्री करून जमिन बळकावली आहे.प्रतीवर्षाप्रमाणे याही वर्षी रंगनाथ सुरवसे व विनोद सुरवसे हे जमीन कसत असताना दिनांक ६ जुलै २०२३ रोजी बालाजी महारूद्ध वाघमारे यांनी अॅट्रॉस्टिचा सहा जणावंर खोटा गुन्हा नोंदविला आहे. तसेच पोलीस स्टेशन वाशी येथे रंगनाथ सुरवसे यांची तक्रार दाखल करून घेण्यात आलेली नाही.तरी वरील रंगनाथ सुरवसे यांची कुळाची जमिन बेकायदेशीरपणे खोटी रजिस्ट्री व फेरफार तात्काळ रद्द करण्यात यावा व सहा जणावंरील अॅट्रॉस्टिचा खोटा गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा. सदर प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी करावी व दोषीवर दि. १० ऑगस्ट २०२३ पर्यत कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा रंगनाथ सुरवसे यांचे संपूर्ण कुटूंब दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी केव्हाही,कोठेही आत्मदहन करतील. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील यांची गांभिर्याने नोंद घ्यावी. तसेच या प्रकरणी नाभिक महामंडळाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर महाराष्ट्र नाभिक महामंडळ उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने, जिल्हा कार्याध्यक्ष धनंजय राऊत,प्रदेश संघटक किशोर राऊत, जिल्हा संघटक प्रेमचंद गोरे, शहराध्यक्ष अक्षय माने, सूर्यकांत पवार, कळंब तालुका अध्यक्ष विष्णू मंडळे, समाधान पवार ,अश्विनी सुरवसे, रेखा सुरवसे, ज्ञानेश्वर पंडित, व्यंकट पवार आदी समाज बांधवांच्या स्वाक्षरी आहेत…
