
दैनिक चालू वार्ता
उप संपादक उस्मानाबाद
नवनाथ यादव
उस्मानाबाद:- यशाची कायम परंपरा जपणारे व अनुभवी शिक्षक वृंद,आधुनिक शिक्षण पद्धती शिक्षणामध्ये सातत्य जपणारे रविंद्र हायस्कूल भूमच्या वतीने सन २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.सन २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत रविंद्र हायस्कूल भूम ने घवघवीत यश संपादन केले. त्यामध्ये एकमेव ८ वी मध्ये शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी कु.आमगे वेदांत योगीराज तालुक्यात प्रथम आला.तर ५ वी मध्ये शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी कु.कांबळे अंकिता विनोद जिल्ह्यात तृतीय तर तालुक्यात प्रथम,बळे संजना अमोल तालुक्यात द्वितीय, शिंदे युगंधरा अजित तालुक्यात तृतीय,वराळे स्वरा युवराज,जाधवर श्रीकर सतिश,सुळ आरोही अनुपकुमार,मुंजाळ मयुरी विनोद,खुणे पृथ्वीराज बाबासाहेब यांनी यश संपादन केले.तर एब्याकस स्पर्धेत बेलकर वृषाली धनंजय राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला.सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थासचिव आर.डी.सुळ, प्राचार्य संतोष शिंदे,अमोल बळे,सुळ जी,डी,प्रशालेचे मु.अ पवार डी ए ,उप मुअ एस व्ही पाटील मॅडम,पर्यवेक्षक लगाडे सर व सर्व शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते…