दै.चालु वार्ता
अर्धापूर प्रतिनिधी मन्मथ भुस्से…
अर्धापूर / येळेगाव:- मराठवाड्याचे भाग्यविधाते जलसंस्कृतीचे जनक भारताचे माजी गृहमंत्री डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद हायस्कूल येळेगाव येथे दि. १८ मंगळवारी रोजी शालेय साहित्य वाटप युवानेत्या श्रीजयताई अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले आहे.
येहळेगाव जि.प.हायस्कुल येथे शालेय साहित्य वाटप आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा नेत्या श्रीजयाताई अशोकराव चव्हाण प्रमुख उपस्थितीत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजीराव गव्हाणे,सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राजु बारसे,धुळेकर मॅडम, देगावचे पोलीस पाटील जगन्नाथ गणपतराव तिडके, मारोतराव पाटील गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थितीत प्रमुख मान्यवरांच्या सत्कार संयोजन सदाशिव पाटील कपाटे यांनी केला.
यावेळी ज्येष्ठ नागरीक व्यंकटराव कपाटे,तालुकाउपाध्यक्ष वसंतराव कपाटे,नांदेड ओबीसी तालुकाप्रमुख गणेशराव भालेराव, लक्ष्मण भालेराव, मोहनराव भालेराव, अजय देशमुख, पवन इंगोले, रावसाहेब गव्हाणे, विश्वंभर गव्हाणे,मुख्याद्यापक कृष्णा उमाटे, सुचीता पांचाळ तसेच युवक काँगेस कार्यकर्ते आनंदराव कपाटे, पांडुरंग कपाटे, गंगाधर कपाटे, दत्ता कपाटे, मदन पाटील कपाटे, आनंदराव शंकरराव कपाटे, मारोती कपाटे, नवनाथ कपाटे, अवधूत कपाटे, शंकर कपाटे, रामजी कपाटे, सुहास पांचाळ, ग्यानोजी कपाटे, बबन सावते यांच्या सह अनेकजण उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कैलास पाटील कपाटे व प्रास्ताविक छत्रपतीचे संचालक सदाशिव पाटील कपाटे यांनी केले तर आभार प्रदर्शन परमेश्वर पाटील कपाटे यांनी मानले.
