
अहमदपूर प्रतिनिधी विष्णु मोहन पोले
अहमदपूर:-अहमदपूर शहरामध्ये नवनिर्वाचित लातूर जिल्ह्याचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झालेले भाजपाचे नेते मा. दिलीपरावजी देशमुख यांची नव्याने भाजपा जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल अहमदपूर व चाकूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी भव्य जंगी स्वागत केले त्याआधी शहरातील महापुरुषांच्य पुतळ्याला छत्रपती शिवाजी महाराज, विनायक दामोदर सावरकर , विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले व दिलीपरावजी देशमुख यांनी जन समुदायास मार्गदर्शन केले आणि भाजपाचे प्रदेश प्रवक्ते मा.गणेश दादा हाक्के पाटील व भारत चामे सर यांनी देखील जनतेला थोडक्यात मार्गदर्शन केले त्याप्रसंगी उपस्थित भाजपाचे प्रदेश प्रवक्ते मा .गणेश दादा हक्के , माजी नगरसेवक युवक नेते डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी भाजपाचे लातूर जिल्हाध्यक्ष निवड झाल्याबद्दल मा.दिलीपरावजी देशमुख यांचा सम्राट मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच या सत्कार प्रसंगी माजी नगराध्यक्ष भारत चामे, भाजपाचे अहमदपूर तालुकाध्यक्ष हनमंतराव देवकते ,हेमंत गुट्टे,वसंत डिगुळे,दत्ता गोरे,राजु कल्याणी,प्रकाश गोरटे,प्रकाश वाकडे,मनोहर गायकवाड प्रशांत पाटील दत्तात्रय जमालपुरे , बालाजी थिट्टे, माणिक नरवटे, गुंजोटीचे सरपंच राम चव्हाण,दत्ता दादेवाड, चंद्रकांत चावरे, गौतम शिंदे,अजमभाई रुईकर , बालाजी गुट्टे, बालाजी होळकर इतर व सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते..