
चाकूर येथे फटाके फोडून व मिठाई वाटून आनंदोत्सव साजर..
दै.चालू वार्ता
चाकूर तालुका प्रतिनिधी किशन वडारे
चाकूर : भारतीय जनता पार्टी च्या वतीने नव्याने ७० जिल्हाध्यक्षांच्या निवडी करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यात लातूर (ग्रामीण) जिल्हाध्यक्षपदी चाकूर अहमदपूर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय नेते तथा लातूर लोकसभा मतदार संघाचे प्रभारी दिलीपराव राजेसाहेब देशमुख यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल चाकूर येथे भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधीनी फटाके फोडून व मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.
चाकूर अहमदपूर विधानसभा मतदार संघातील नेत्यांना भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी विराजमान होण्याची पहिल्यांदा संधी दिलीपराव राजेसाहेब देशमुख यांच्या रूपाने मिळाली आहे. याचा आनंद भाजपा कार्यकर्त्यांसह देशमुख परिवारावर प्रेम करणाऱ्यांना झाला आहे. या निवडीबद्दल भारतीय जनता पार्टी चाकूर च्या वतीने फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. या वेळी भाजपाचे नेते वसंतराव डिगोळे, सुरेश हाके, अंकुशराव जनवाडे, तुकाराम मद्दे, प्रशांत बिबराळे, दयानंद पाटील, उपनगराध्यक्ष अरविंद बिराजदार, नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष नितीन रेड्डी, नगरसेवक साईप्रसाद हिप्पाळे, माजी नगरसेवक रवींद्र निळकंठ, उमाकांत शेटे, अशोक शेळके, रुद्र होळदांडगे, गजानन करेवाड, नितीन डांगे, दत्ता मुळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थीत होते.