
दैनिक चालू वार्ता
उप संपादक उस्मानाबाद
नवनाथ यादव
उस्मानाबाद:-भूम तालुका भाजप पार्टीच्यावतीने आपल्या राज्याचे कर्तृत्ववान आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व तथा महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उप मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भूम येथे विविध कार्यक्रम साजरे केले. यासाठी महाएनजीओ फेडरेशन – नेहरू युवा केंद्र – व जनविकास सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मोठे योगदान मिळाले.शानिवार दि २२ जुलै २०२३ रोजी अभ्यासू व्यक्तिमत्त्व तथा महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उप मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस साजरा साजरा केला. या निमित्ताने बस स्थानक परिसरात ५२ वृक्ष विविध जातीचे वृक्षारोपण केले नंतर, मूक बधिर शाळेतील मुलांना खाऊ ,फळे , वाटप केली.यावेळी महाएनजीओ फेडरेशन – नेहरू युवा केंद्र – व जनविकास सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित वृक्षारोपन फळ वाटप प्रसंगी भाजपचे तालुक्याचे जेष्ठ नेते बाळासाहेब क्षीरसागर , तालुक्याचे अध्यक्ष महादेव वडेकर , शहर अध्यक्ष शंकर खामकर , उपाध्यक्ष अमोल बोराडे , बाबा वीर , तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर , हेमंत देशमुख , रोहन जाधव , प्रदीप साठे , शांतीराज बोराडे , संदीप महानवर , चंद्रकांत गवळी , विधिज्ञ संजय शाळू , चंद्रकांत गवळी, अल्पसंख्यांक ता. अध्यक्ष महेबूब शेख शहर अध्यक्ष प्रदिप साठे, तालुका सोशल मीडिया अध्यक्ष सुहास बुरटे , तसेच महिला सौ अश्विनी साठे , सौ मंगल काकू साठे , सौ .सपना सातपुते , तसेच भरपूर संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते…