
दै.चालु वार्ता
जालना प्रतिनिधी आकाश माने
जालना जिल्ह्यासह मराठवाड्याचे आराध्य दैवत आणि अंबड शहराचे ग्रामदैवत श्री मत्स्योदरी मातेच्या मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्या तीन चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासांमध्ये आरोपींना जेरबंद केले. शिवाजी सुभाष बरडे, अशोक विठ्ठल भोसले आणि गणेश विश्वनाथ गायकवाड अशी आरोपींची नावे आहेत.
मत्स्योदरी देवी मंदिरातील दानपेटी फोडल्याची घटना 21 जुलै रोजी सकाळी उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यासंदर्भात विधानसभेतही आवाज उठविण्यात आला होता. याप्रकरणी 21 जुलै रोजी मत्स्योदरी देवी संस्थानाचे व्यवस्थापक कैलास रखमाजी शिंदे यांच्या फिर्यादिवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरांनी मंदिराराच्या गाभाऱ्यात असणाऱ्या दानपेटीचा लोखंडी पत्रा कापून 60 हजारांची रक्कम लंपास केली. या चोरीच्या घटनेमुळे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी संपूर्ण पोलीस यंत्रणेला सतर्क करून कामाला लावले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी घटनास्थळाची पाहणी करून तातडीने सूत्रे हलवून विविध पथके तैनात केली.
बडची मत्स्योदरी देवी ही लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून या ठिकाणी यासारखी गंभीर घटना घडणे म्हणजे पोलीस यंत्रणा किती सुस्त आहे हे लक्षात येते. जिल्ह्यातील भाविकांच्या श्रद्धास्थानावर झालेल्या या चोरीचा तपास पोलिसांनी त्वरित लावावा व चोरांना त्वरीत अटक करावी अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पोलीस प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना सहसंपर्कप्रमुख शिवाजीराव चोथे यांनी दिला होता. त्यानंतर पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवली. त्यानंतर खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी सुभाष बरडे याला ताब्यात घेतले.
पोलीस चौकशीमध्ये त्याने विठ्ठल भोसले (वय – 27) आणि गणेश गायकवाड (वय – 40, तिघे रा. काजळा, ता. बदनापूर, जि. जालना) व इतर दोन असे पाच जणांनी मिळून मध्यरात्रीच्या सुमारास गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी विठ्ठल आणि गणेशलाही ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींकडून 43 हजार 415 रुपयांची रोख जप्त केली. तिन्ही आरोपींना मुद्देमालासह अंबड पोलिसांकडे देण्यात आले असून पुढील तपास परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक चैतन्य कदम हे करीत आहेत. गुन्ह्यातील इतर दोन आरोपींचा शोध घेणे चालु आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक चैतन्य कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, फुलचंद हजारे, विनोद गदधे, कृष्णा तंगे, जगदीश बावणे, रुस्तुम जैवाळ, दत्तात्रय वाघुडे, सागर बावस्कर, सचिन चौधरी, विजय डिक्कर, लक्ष्मीकांत आडेप, देविदास भोजणे, किशोर पुंगळे, रवि जाधव, भागवत खरात, सचिन राऊत, कैलास चेके, योगेश सहाणे, धिरज भोसले, चंद्रकला शडमल्लु चालक धम्मपाल सुरडकर, रमेश पैठणे सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे.