
दैनिक चालू वार्ता
उप संपादक उस्मानाबाद
नवनाथ यादव
उस्मानाबाद:-भूम परांडा वाशी या तालुक्यासाठी शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशावरून युवासेना जिल्हा प्रमुख या पदावर निवड केली जाते.जिल्हा प्रमूखपद हे रिक्त झाल्याने या पदासाठी निष्ठावंत शिवसैनिक प्रल्हाद आडागळे व माऊली शाळू यांच्या मध्ये रसिखेच चालू असुन रिक्त झालेल्या पदावर कोणाची वर्णी याकडे मतदार संघातील शिवसैनिकांचे लक्ष लागलेले आहे.युवासेना प्रमुख आदित्य उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून युवा सेना पदाधिकारी यांची निवड केली जात आहे.मध्यंतरी शिवसेना पदाधिकारी यांच्या जिल्ह्यातील निवडी शिवसेना पक्ष प्रमूख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरू पदाधिकारी यांच्या निवडी झालेल्या असुन यामध्ये युवा सेना जिल्हा प्रमुख डॉ चेतन बोराडे यांची शिवसेना उपजिल्हा प्रमूख म्हणून निवड केली असल्याने सदरिल पद रिक्त झालेले आहे या पदावर निवड करण्यासाठी वरिष्ठ पातळी वर शिवसैनिकांमध्ये चाचपणी चालु असुन ग्रामीण भागातुन निष्ठावंत शिवसैनिक प्रल्हाद आडागळे व शहरी भागातुन माऊली शाळू यांची नावे पुढे येत आहे प्रल्हाद
आडागळे हे निष्ठावंत शिवसैनिक भारतीय विद्यार्थी सेना तालुका प्रमुख पदापासुन पाटसांगवी ग्रामपंचायत सदस्य सलग तिन वेळा निवडून आले.असुन आता चालु ग्रामपंचायत सदस्य आहेत. आतापर्यत प्रल्हाद आडागळे यांनी प्रत्येक निवडणूकी मध्ये जबाबदारी घेऊन काम केले आहे. सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये असलेले निष्ठावंत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील ,सह संपर्क प्रमुख शंकरराव बोरकर खासदार ओमराजे निंबाळकर आ.कैलास पाटील यांच्या बरोबर एकनिष्ठेने पक्ष हिताचे काम करत आहे आता सध्या भूम परांडा वाशी विधान सभा प्रमुख म्हणून त्यांच्या वर जबाबदारी असून त्यांनी त्यांनी मतदार संघामधे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी तरुणांची ताकद उभी केली आहे. या मतदार संघाचे पालकमंत्री आ.प्रा.डॉ तानाजी सावंत हे शिवसेना सोडून गेले असल्याने ठाकरे गटाकडून त्यांच्या विरोधात ही मोर्चे बांधणी साठी प्रल्हाद आडागळे यांचीच निवड करावी अशी मागणी होत असुन तसेच शिवसेना विधानसभा समन्वयक दिलिप शाळू हे शिवसेना नेते माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे जवळचे असून देखिल निष्ठावंत शिवसैनिक असुन त्यांचे चिरंजीव माऊली शाळू अरोग्यकक्ष तालुका पदाची जबाबदारी घेऊन काम केले आहे. त्या पदाचा राजीनामा देऊन ठाकरे गटात राहणे पसंत केले आहे. भूम परांडा वाशी विधान सभा मतदार संघाचे आमदार तानाजी सावंत यांना टक्कर देण्यासाठी तरुणांची फळी उभी करणे हे मोठे सितापीचे आहे. प्रल्हाद आडागळे यांना भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचा अभ्यास असल्यामुळे प्रल्हाद आडागळे यांची निवड होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. सामान्य कार्यकर्त्यां कडून व शिवसैनिका तुन निष्ठावंताना न्याय द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.