
दै.चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे…
देगलूर:दिनांक २२ जुलै 2023 रोजी देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापुरकर यांनी मुंबईतील चालू पावसाळी अधिवेशन सोडून आपल्या मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पाहणी दौरा केला खानापूर सकाळी 08.30 वा.तडखेल
स. 09.00 वा.सुगाव लख्खा
स. 09.30 वा.वझरगा- तूपशेळगाव स. 10.00 वा.
टाकळी, अटकळी आदमपुर
स. 10.30 वा. वन्नाळी
स. 11.00 वा.शहापूर- रामपूर स. 11.30 वा.
दु. 12.00 वा. नरंगल
मेदकल्लूरदु. 12.30 वा. शेळगावदु. 01.30 वा.तमलूर
दु. 02.00 वा. सगरोळी
बोळेगाव दु. 02.30 वा.
कार्ला (बु.येसगी दु. 03:३० या गावात व गावातील शिवारामध्ये जाऊन आमदारांनी पाहणी केली पाहणी दरम्यान देगलूर बिलोली प्रशासकीय यंत्रना
उपविभागीय अधिकारी., तहसिलदार, . उपविभागीय कृषि अधिकारी, तालूका कृषिअधिकारी,गटविकास अधिकारी कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता सा.बा., . कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंताम.रा.वि.वि. कं. 5. देगलूर, . कार्यकारी अभियंता जि.प, उपकार्यकारी अभियंता, तालूका पशुवैद्यकीय अधिकारी, .तालुका आरोग्य अधिकारी, सर्व शासकीय अधिकारी आमदार महोदयांच्या नियोजित पाहणी दौऱ्यात सोबत दिवसभर होते. उशिरा पावसाळा सुरु झाल्यामुळे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. परंतु गेल्या तीन दिवसापूर्वी झालेल्या ढगफुटी सदृष्य पावसाने पेरण्या वाया गेल्या. अंकुरलेली पिके खरडून निघाली. मूग,उडिद, सोयाबीन, कापूस यांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. तसेच अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे देगलूर व बिलोली तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. देगलूर बिलोली तालुक्यातील गावामध्ये जाऊन आमदार रावसाहेब अंतापुरकर यांनी प्रत्यक्ष दर्शनी भेट देऊन त्यांनी सर्व शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी नुकसान भरपाई देण्याचे तहसीलदार कृषी अधिकारी यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेशित केले .अतिवृष्टीमुळे शेकडो एकर शेतीचे नुकसान झाले आहे. शेकडो घरांची पडझड झाली आहे. अनेक रस्ते खरबडून निघाले आहेत. पुलाचेही नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागातील तातडीने शेतकऱ्यांना व नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने आर्थिक मदत . द्यावी अशी मागणी चालू अधिवेशनामध्ये पुन्हा जाऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासमोर देगलूर बिलोली तालुकाची परिस्थिती सांगून जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी दिली जाईल याकडे मी विनंती करेन असे आमदार जितेश भाऊ अंतापूरकर यांनी देगलूर बिलोली तालुक्यातील जनतेला पाहणी दरम्यान आश्वासन दिले त्याबद्दल देगलूर बिलोली तालुक्यातील शेतकरी व सरपंच व गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी आमदार जितेश अंतापुरकर यांनी भेट दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले..