
दैनिक चालु वार्ता
मंठा प्रतिनिधी /सुरेश ज्ञा. दवणे..
जालना मंठा..मंठा, ता. २० : अंभोरा शेळके येथील सरपंच अरुणाबाई आघाव यांनी अतिक्रमण केल्याप्रकरणी प्रल्हाद आघाव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना पंधरा दिवसांच्या आत पाहणी करून अहवाल मागविण्यात आला होता.दरम्यान,
मंगळवारपर्यंत(दि. १८) ही कार्यवाही अपेक्षित होती.
मात्र तसे झाले नाही. त्यातच कार्यवाहीपूर्वी मंगळवारी जेसीबी, ट्रॅक्टर लावून सरपंचांनी हे अतिक्रमण काढून घेतले. त्यामुळे याबाबत चौकशीसह कारवाई करण्याची मागणी प्रल्हाद आघाव यांनी बुधवारी (दि. १९) जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.