
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी मंठा/सुरेश ज्ञा. दवणे..
जालना मंठा..महाराष्ट्र राज्यात सध्या अभद्र सरकार सत्तेवर असून या सरकार मधील मंत्री,नेते कार्यकर्ते हे महिलांना हिन वागणूक देत असून महिलांचे शोषण केले जात.त्या मुळे महिला वर्गातून संताप व्यक्त केला जात आसल्याने मतदार या सरकारला कधीच माफ करणार नाहीत असे विचार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जिल्हा संपर्कप्रमुख तथा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मा.अध्यक्षा सो.ज्योतीताई ठाकरे यांनी मांडले. त्या मंठा येथे आयोजित महिला आघाडी पदाधिकारी बैठकीस मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
या प्रसंगी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख तथा मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ए.जे.बोराडे,तालुका प्रमुख अजय अवचार,उपजिल्हा संघटक श्रीमती बेबीताई पावसे,तालुका संघटक श्रीमती गयाताई पवार,श्रीमती पूजा टेहरे,श्रीमती मंगल मेटकर,श्रीमती मंजू घायाळ,श्रीमती गंगुताई वानखेडे,श्रीमती संगीता सानप,उपनगराध्यक्ष जे.के.कुरेशी,नगरसेवक बाज खा पठाण,आरून वाघमारे,उबेद बागवान,तुळशीराम कोहोरे यांची उपस्थिती होती. बैठकीच्या सुरुवातीस सो. ज्योतीताई ठाकरे यांनी ए.जे.बोराडे यांची कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निवड झाल्याबद्दल सत्कार केला. यावेळी पुढे बोलताना श्रीमती ठाकरे म्हणाले की, शिवसेना पक्षात महिलांचा नेहमीच मान दिला जातो.जो इतर पक्षात दिला जात नाही.राज्यात अत्यंत गलिच्छ राजकारण सुरू असून महिला सुरक्षित नाहीत.हे सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत असून राज्यातील विकास प्रकल्प इतर राज्यात पळवले जात आहेत.राज्यात सगळीकडे अराजकता माजली असून सरकार सत्ता टिकवण्यासाठी धडपड करताना दिसत आहे.राज्यात व देशात सर्वत्र महागाई वाढली आहे.उज्वला गॅस योजनेच्या नावाखाली सुरुवातीस मोफत गॅस देऊन आज तोच गॅस बाराशे रुपये प्रमाणे विकला जात आहे. रेशनकार्ड वर मिळणारे केरोसीन आज मिळत नाही, शंभर रुपयात दिला जाणारा आनंदाचा शिधा मधील केवळ फक्त दोनच वस्तू पुरवण्यात आल्या तर उर्वरित दोन वस्तू नंतर देऊ असे सांगून सामान्य जनतेची फसवणूक केली आहे. या वरून हे स्पष्ट होते की,भाजपाच्या नेत्यांना परिस्थितीचे भान राहिलेले नसून महिलांची कुचेष्टा करणाऱ्या सरकारला त्यांची जागा मतदार निश्चत दाखवतील असा विश्वास शेवटी व्यक्त केला.
या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे यांनी बोलतांना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून प्रेरित झालेला शिवसेना पक्ष महिलांचा सन्मान करण्यात सर्वात अग्रेसर असून महिलांना सक्षम करण्याचे काम पक्षाने सातत्याने केले आहे. बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना आधार देण्याचा प्रयत्न शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.स्व. हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारानुसार महिला सक्षम झाली तर गाव,तालुका,जिल्हा राज्य सुधारू शकते. त्यामुळे महिलांना सक्षम करण्यासाठी शिवसेना पक्ष सातत्याने महिलांच्या पाठीशी राहिला आहे.सरकार मधील काही नेते महिलांची कुचेष्टा करत असून महिलांना दुर्बळ करण्याचा घाट शासनाने चालवला आहे. भाजपाच्या किरीट सोमय्या सारखा नेता जर महिलांना त्रास देत असेल तर भाजपा पक्षाच्यावतीने त्याच्यावर तात्काळ कारवाई होणे आवश्यक्य असताना पक्ष त्याना पाठीशी घालताना दिसत आहे.हे लोकशाहीस घातक असून शासनाचा पापाचा घडा भरला आहे. त्यामुळे महिलांनी एकजूट होऊन येणाऱ्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षांना त्यांची जागा दाखवावी असे विचार मांडले.या वेळी मंठा नगर पंचायतचे नगरसेवक,युवा सेना,रिक्षा युनियनच्या वतीने सो. ज्योतीताई ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीते साठी सो.रुक्मिणीताई घोडके,सो.छायाताई वाघमारे,सो.प्रभावतीताई देशमुख,श्रीमती चंदाताई निर्मळ,कौशल्याताई घुले,शोभाबाई अवचार, सावित्राबाई खेत्रे,रांगुबाई खंदारे,सीमा जाधव, रेहना अन्सर आतार,सुरेखा राजेंद्रसिंह चव्हाण, कविता सुभाष बोराडे,शोभा विकास राठोड,विमल शेषराव चव्हाण,कांता सोनाजी खरात,
अनिल हिरे,दिगंबर बोराडे, देविदास खरात,भागवत चव्हाण यांनी परिश्रम घेतले.सूत्र संचालन सतीश खरात यांनी केले.
या वेळी भाजपा ज्येष्ठ नेते मा.खा.किरीट सोमय्या यांना महिला आघाडीच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले.यावेळी किरीट सोमय्या यांच्या विरोधात महिलांनी किरीट सोमय्या यांचे करायचे काय खाली मुंडके वर पाय अश्या घोषणा देऊन त्यांचा निषेध केला..
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जिल्हा संपर्कप्रमुख सो ज्योतीताई ठाकरे व जिल्हाप्रमुख ए.जे बोराडे यांच्या उपस्थितीत सो.वंदना आशिष रंजवे,सो.विद्या सुखदेव रंजवे,कु.कविता जयवंत वडगावकर,सो. संगीता भारत रंजवे,श्रीमती काशीबाई शिरगुळे,सो.सरस्वती वाघमारे,सो.अरुणा मांगझरे,सो.सुलोचना इंगळे,सो.ज्योतीताई कासारे,सो.सुनिता काळे,सो.निर्मलाताई बोराडे,सो.लक्ष्मीबाई देवकर यांच्यासह अनेक शहरातील व ग्रामीण भागातील महिलांनी शिवसेना पक्षात प्रवेश घेतला…