
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी..
मुखेड तालुक्यात दि. 20 /जुलै रोजी संध्याकाळी मुसळधार पाऊस झाल्यामुळे मुखेड तालुक्यातील संजीवन विस्कळीत झाले, असून याबाबत जिल्हा प्रशासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशित करावे व आपत्ती ग्रस्त शेतकरी व नागरिकांना तात्काळ शासनाचे मदत द्यावी अशी मागणी आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई येथे केली
मुखेड तालुक्यातील बाराहाळी, येवती, व जाहूर, या तीन मंडळात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून, कमी वेळात आधी तीव्रतेने झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे अनेक ठिकाणी रस्त्यावरील पूल वाहून गेले व रस्ते खचले त्यामुळे सकाळपर्यंत बऱ्याच गावांचा संपर्क होऊ शकला नाही. पावसामुळे शेतजमीन खरबडून गेल्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे 50 पेक्षा अधिक गावातील सकल भागातील घरामध्ये पाणी शिरल्यामुळे जीवनाशक वस्तूची नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांची गोरे,ढोरे, सुद्धा पाण्यामध्ये वाहून गेले आहेत. किंवा अतिवृष्टीमुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. तरी जिल्हा प्रश्न तात्काळ आदेशित करून नुकसानीचे पंचनामे करावेत व तसेच आपत्तीग्रस्त शेतकरी व नागरिकांना तात्काळ शासनाची मदत करावी अशी मागणी आ.डॉ. तुषार राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे मुंबई येथे 21 जून रोजी केली आहे.