
दैनिक चालू वार्ता
किनवट प्रतिनिधी दशरथ आंबेकर…
ऍड.माजी खासदार बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात मुंबई येथे गायरान जमिनी धारकांना त्यांच्या नावे जमीन करून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कडून मुंबई येथे महामोर्चाचेआयोजन केले होते. ह्या मोर्चात लाखोंचा बहुजनाचा जनसमुदाय राज्यातुन सहभागी होऊन जोरदार नारे बाजी देत मोर्चा मंत्रालया जवळ सीएसटीला धडकला तिथे अनेक प्रमुख मान्यवरांची भाषणे झालीत. राज्यातील३५८ तालुक्यातील दोन लाख ४७ हजार अतिक्रमण धारकांना अतिक्रम हटविण्यासाठी शासनाने नोटीसा दिल्या होत्या.त्यामुळे अनेक गोरगरीब नागरिकांना बेघर होण्याची भीती वाटत होती.हे लक्षात घेऊन एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी मंत्रालयावर मोर्चा काढून सर्वच मागण्या मंजुर करून घेतल्या आहेत.त्यामुळे अतिक्रमण धारकांमध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळाले आहे.वंचित बहुजन आघाडीचा प्रचंड महामोर्चा दि. २०जुलै २०२३ रोजी गुरुवारी मुंबईत धडकला मेट्रो सिनेमापासून दुपारी बाराच्या दरम्यान निघालेला हा मोर्चा सुरु ठेवून एडवोकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे शिष्ट मंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना भेटले व अतिक्रमण धारकवर होतअसलेल्या अन्यायावर विविध प्रश्न मांडून उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले त्याच बरोबर मुंबईतील रखडलेले एस आर ए प्रकल्पचा ही प्रश्न मांडला तेव्हा राज्यातील गायरान जमिनीवर झालेले एकही अतिक्रमण हटविले जाणार नाही.गायरान जमिनीच्या सातबाऱ्यावर ज्याचे अतिक्रमण आहे. त्यांची नावे लावण्याची प्रक्रिया तहसीलदारामार्फत राबविण्यात येईल, असे ठोस आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना दिलेआहे. उपमुख्यमंत्री व बाळासाहेबांचे शिष्टमंडळ यांच्यात चर्चा होऊन सर्वच मागण्या मंजुर करून घेतल्या आहेत.असे बाळासाहेब आंबेडकरांनी मोर्चात येऊन सांगितल्यामुळे सर्वच मोर्चेकरी मोर्चा यशस्वी झाला म्हणून आनंदात आप आपल्या घरी परतले असल्याचे आयु.संतोष शेरे यांनी मोबाईल वरुन संपर्क केल्यानंतर सांगितले आहे.