दैनिक चालू वार्ता
किनवट प्रतिनिधी दशरथ आंबेकर
किनवट तालुक्यात गेल्या २२ जुलै पासून पावसाचे थेमान घातले आहे. कंचली इस्लापूर शिवणी अप्पाराव पेठ जलधारा धानोरा बोधडी परोटी तांडा परोटि सहस्रकुंड भागात मुसळधार पाऊस व ढग फुटी मुळे मोठ्या प्रमाण शेतकऱ्याचे पिकाचे नुकसान झाले आहे. नदी काट असणाऱ्या कापूस मूग उडीद पीक शेतकऱ्याची जमीन खरडून जाऊन शेतीतिल माती वाहून गेली आहे कोल्हारी व मलकजाम येथे जोरदार पाऊस झाल्याने येथील चंद्रकांत नामदेव शेरे यांचे राहते घर पडल्यामुळे संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. मलकजाम येथील शेतकरी लक्ष्मण भोजन्ना जंगीटवाड यांचे घर रात्रीच्या पावसामुळे कोसळले. सुदैवाने जीवितहानी टळली तर शासकीय मदत मिळावी म्हणून परिवाराकडून मागणी होत आहे.सदरील संपूर्ण तालुक्यातील पाहणी करून ज्यांचे घर पडले आहे त्यांचे नवीन घर देऊन पुनर्वसन करावे प्रति शेतकऱ्यांना शासनाने ५० हजार आर्थिक मदत करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे तालुका सचिव संतोष शेरे यांनी केली आहे…