पोलिस उपनिरीक्षक दिगंबर पाटील यांची कारवाई…
दै.चालु वार्ता भोकर तालुका प्रतिनिधी
विजयकुमार चिंतावार
पोलीस स्टेशन भोकर येथील पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पांडुरंग पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार त्यांनी आपल्या काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन चोरट्या मार्गाने विक्रीसाठी नेत असलेली अवैद्य देशी व विदेशी दारू घेऊन जात असताना ७२ हजाराचा मुद्देमाल पकडला
शहरातून खेडेगावात विक्रीसाठी घेऊन जात असल्या बाबत गोपनीय मिळालेल्या माहितीनुसार अवैद्य देशी व विदेशी दारू विक्रीसाठी चोरट्या मार्गाने अवैध वाहतूक करत असताना प्रकाश भिक्कू आडे (४५) रा. सोमठाणा ता. भोकर यास भोकर किनवट रोडवर किन्हाळा पाटी जवळ पकडले व त्यास गाडीत काय आहे अशी विचापूस करून गाडी तपासली असता त्याच्याकडून देशी दारू भिंगरी संत्रा १८० मिली च्या ४८ बॉटल, विदेशी दारू मॅकडॉवेल्स नंबर वन १८० मिली ४० बॉटल,रॉयल स्टग १८० मिली च्या २० बॉटल , इम्पेरियल ब्ल्यू १८० मिली च्या २० बॉटल, स्ट्रॉंग बिअर ६५० मिलीच्या १० बॉटल, किंग फिशर बिअरच्या ३३० मिलीच्या २० बॉटल, किंगफिशर बिअर ६५० मिलीच्या १० बॉटल आणि ही सर्व अवैध दारू घेऊन जात असलेली मारुती सुझुकी कंपनीची अल्टो कार ८०० जीचा गाडी क्रमांक महा २६ ई १९१२ यासह एकूण ७२ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई दिनांक २३ जुलै २०२३ रोजी दुपारी अंदाजे १ वाजता करण्यात आली आहे.
सदरील कार्यवाही ही पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पांडुरंग पाटील यांच्यासह पोलीस जमादार रवी मुधोळे, सय्यद मोईन, परमेश्वर कळणे, राजेश्वर कळणे यांनी ही कार्यवाही पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्रीचा धंदा तेजीत आल्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत असून विशेषतः तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी जावुन बरबाद होत आहे. महिलांना मात्र नरक यातना भोगाव्या लागत आहेत.याची दखल घेऊन पोलिसांनी दक्ष राहून अवैध धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळल्याने सर्व स्तरातून विशेषता महिला वर्गाकडून समाधन व्यक्त करत आहेत.या कारवाईने अवैध मार्गाने चोरटी दारू विक्री करणाऱ्याना धाक निर्माण झाला आहे.