दैनिक चालू वार्ता
उप संपादक उस्मानाबाद
नवनाथ यादव
उस्मानाबाद:-महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदी ऍड.धैर्यशील गाढवे यांची निवड झाल्यामुळे भूम तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.त्यानिमित्ताने माजी नगराध्यक्ष संजय गाढवे व जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ.संयोगीताताई गाढवे यांच्या हस्ते गाढवे परिवारातील हुशार,आदर्श व्यक्तिमत्व,संजय नानांचे पुतणे तथा जेष्ठ विधीज्ञ ऍड.पोपटराव गाढवे यांचे चिरंजीव ऍड.श्री.धैर्यशील गाढवे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदी निवड झाल्या बद्दल पेढा भरवून त्यांचा सन्मान करण्यात आला.तसेच शिवसेनेचे शहर प्रमुख,मा.नगरसेवक संजय पवार यांचा देखील वाढदिवसा निमित्त सत्कार करून त्यांना देखील शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी डॉ.सई संजय गाढवे,ऍड.पोपटराव गाढवे,उद्योजक सुरज गाढवे,ऍड.पंडित ढगे,ऍड.दत्ता जावळे,जांब गावचे सरपंच समाधान भोरे,मा.नगरसेवक धनंजय मस्कर,किरण जाधव,बाळासाहेब अंधारे,सुनील माळी,राम बागडे,पत्रकार अब्बास सय्यद यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते…
