दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे…
देगलूर; दिनांक 20 जुलै 2023 रोजी देगलुर बिलोली मतदारसंघातील झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीमुळे नुकसानग्रस्त भागाच्या तात्काळ मदतीसाठी पावसाळी अधिवेशनात राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण व आमदार जितेशभाऊ अंतापुरकर ह्यानी दिनांक २१ जुलै रोजी आवाज उठवला होता त्या अनुषंगाने तातडीने दिनांक २२ व २३ जुलै रोजी आमदार जितेश भाऊ अंतापुरकर यांनी देगलुर बिलोली तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची दोन दिवस पाहणी करुण तात्काळ मुंबई पावसाळी अधिवेशनात गाठून मुख्यमंत्री.एकनाथराव शिंदे यांची भेट घेऊन देगलूर बिलोली तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा अहवाल दिनांक २४ जुलै रोजी सादर केला आणि झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीमुळे नुकसानीचे तात्काळ मदत जाहीर करण्यात यावी आणि त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी देगलूर बिलोली मतदार संघाचे आमदार जितेश भाऊ अंतापुरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली…
