गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
माता मुक्ताईच्या शिकवणीमुळे भाई केशवराव धोंडगे यांनी राज्यात व देशात नाव कमाविले असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. धाराशिव शिराळे यांनी लोहा येथे श्री संत गाडगे महाराज प्राथमिक ,माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तुळजाई मंगल कार्यालयात कार्यालयात मातोश्री मुक्ताई धोंडगे यांच्या ५९ व्या समारंभ व्याख्यानमालेत केले.
श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक माजी खासदार व आमदार कै. भाई केशवराव धोंडगे यांच्या मातोश्री मुक्ताई धोंडगे यांच्या ५९ व्या स्मृतीदिनानिमित्त लोहा येथील श्री संत गाडगे महाराज प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय व व वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने , मातोश्री मुक्ताई धोंडगे यांच्या ५९ वा स्मृती सभारंभ , बक्षीस वितरण,व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हि.जी. चव्हाण (अध्यक्ष श्री संत गाडगे महाराज महाविद्यालय विकास समिती) होते तर प्रमुख पाहुणे म्हणून किशनराव पाटील ढगे ( अध्यक्ष श्री संत गाडगे महाराज प्राथमिक शाळा लोहा), प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. धाराशिव शिराळे होते.
यावेळी प्रथम माता मुक्ताई व भाई केशवराव धोंडगे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर कार्यक्रम सुरुवात झाली यावेळी बोलताना भाई केशवराव धोंडगे यांनी देशाला अभिमान वाटावे असे कार्य केले.
माता मुक्ताईला चार मुले झाली त्यात भाई केशवराव हे १०५ वर्ष जगले. भाई केशवराव धोंडगे यांना माता मुक्ताईने चांगली शिकवण दिली त्या म्हणाल्या बाळा तुला ज्ञान प्राप्ती करण्यासाठी फार अडचणी आल्या पण माझ्या दरी खोऱ्यातील लेकराला शिक्षण मिळावे पाहिजे म्हणाल्या व भाई केशवराव धोंडगे यांनी अनेक शाळा काढल्या . ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी माॅ जिजाऊची प्रेरणा घेऊन बहुजनाचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले त्याप्रमाणे माता मुक्ताईची प्रेरणा घेऊन भाई केशवराव धोंडगे यांनी ज्ञानाची गंगा आणली असे प्रा. धाराशिव शिराळे म्हणाले तसेच यावेळी प्रा. शिराळे यांनी गित सादर केले ते पुढीलप्रमाणे
” माय नमन हे तुला गातो गोड तुझी गाणी .
आई केशवाची थोर पेटविली ज्ञानज्योत.
सुग्या मुग्याच्या लेकरा ज्ञानदान तिन दिल.
माय तुझ्या ग त्यागान भागयू आमच ग उजळल.
वंदन ग माय तुला कोटी मानाची जयक्रांती. तुझ्या रुपानी जळती ज्ञानाची पणती
असे
त्यांनी माता मुक्ताई व भाई केशवराव धोंडगे यांच्या जीवनावर अनेक गिते व कविता सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
तसेच यानंतर श्री संत गाडगे महाराज वरिष्ठ महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले
यावेळी श्री संत गाडगे महाराज वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक गवते, श्री संत गाडगे महाराज उच्च माध्यमिक विद्यालयाचे मु.अ.डी.एस. बोधगिरे, उप मु.अ. ए व्ही.जाधव , प्राथमिक चे मु.अ.एस आर लुंगारे , प्रा. मंडगे , प्रा.जयराम सुर्यवंशी, यांच्या सह सर्व शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जयराम सुर्यवंशी यांनी केले तर आभार घोरबांड सर यांनी मानले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने झाले.
