
तहसीलदार मार्फत केंद्रीय गृहमंत्री यांना निवेदन…
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : मागील काही महिन्यापासून मणिपूर येथे हिंसाचाराच्या घटना घडत आहेत.या सर्व घटना दरम्यान दोन महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व त्यातील दोषीना फाशीची शिक्षा व्हावी त्यासाठी राष्ट्रीय ओबीसी क्रांती दल महाराष्ट्र राज्य च्या वतीने संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष एड.राजेंद्र महाडोळे यांचे आदेशावरून प्रदेश महासचिव प्रवीण पेटकर यांच्या नेतृत्वात अंजनगाव सुर्जी येथील तहसीलदार यांच्यामार्फत केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार यांना २५ जुलै रोजी निवेदन देण्यात आले.
निवेदन मधे सादर केल्याप्रमाणे सदर प्रकार हा अत्यंत घृणास्पद असून मानवतेला काळीमा फासणारा आहे.या भारत देशात महिलांवर लैंगिक अत्याचार होत आहे.त्यांचे वस्त्रहरण केले जात आहे.त्यांची धिंड काढली जात आहे.या निंदनीय प्रकाराकडे केंद्र तथा राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे.याचा जाहीर निषेध करीत सदर प्रकरणाच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये या करिता केंद्रसरकारने त्या पीडित महिलांना आणि मणिपूर येथील जनतेला न्याय द्यावा.महिला अत्याचार प्रकरणात दोषीना फाशी द्यावी अशी मागणी या निवेदकामधून करण्यात आली.
यावेळी प्रदेश महासचिव प्रवीण पेटकर,प्रसिद्ध प्रमुख संजय वाघुळे,महिला आघाडीच्या सविता पेटकर,तालुका संघटक अमोल हाडोळे तसेच सिद्धार्थ सावळे,रमेश सावळे,विनंती तायडे,मंगेश इंगळे,प्रेमदास तायडे,मुकेश वानरे जहिर बेग,राजू शेठ कुरेशी,अफसर बेग ,शाम सोयाम आदी उपस्थित होते.