
सभेद्वारे शेतकऱ्यांपर्यंत दाखविण्यात येणार थेट प्रक्षेपण…
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील शेतकऱ्यांना संबोधित करणार असून शेतकऱ्यांकरिता योजना जाहीर करणार आहेत.अंजनगाव सुर्जी शहरातील शेतकरी वर्गाकरिता २७ जुलै २०२३ रोजी ११ वाजता १७ कृषी केंद्रावर प्रधानमंत्री किसान समृद्धी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात येणार आहे.
*देशातील शेतकऱ्यांसाठी खालील गोष्टी जाहीर केल्या जाणार*
१) प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र (पीएम के एस के )- १,२५,००० केंद्र देशातील शेतकऱ्यांना समर्पित करणार
२)पीएम किसान निधी च्या पुढील हप्त्याचे वितरण
३) सल्फर लेपित युरिया चे लॉंचिंग केले जाणार
*अंजनगाव सुर्जी शहरातील या केंद्रांवर होणार थेट प्रेक्षेपण*
अंजनगाव सुर्जी येथील पवार कृषी केंद्र,वर्षा कृषी केंद्र,महावीर अग्रो एजन्सी,रोहित ॲग्रो एजन्सी,शिवकृपा ॲग्रो एजन्सी,शेत माऊली ॲग्रो एजन्सी,मेथी कृषी केंद्र,मुंगसाजी कृषी केंद्र,श्री ॲग्रो एजन्सी,नरसिंग ॲग्रो सर्व्हिस,निपाने ॲग्रो एजन्सी,किसान ॲग्रो एजन्सी,श्री समर्थ कृषी केंद्र,श्री बालाजी कृषी केंद्र,नरसिंग कृषी सेवा केंद्र,कृषी सेवा केंद्र,सागर कृषी सेवा केंद्र या प्रत्येक कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे थेट प्रेक्षेपण दाखविण्यात येणार आहे आणि त्यासंबंधित माहिती देण्यात येणार आहे.