
कंधार तालुक्यात डोळे लाल होण्याचे प्रमाण वाढले;ताप खोकल्याचे रुग्ण….
दैनिक चालू वार्ता
कंधार तालुका प्रतिनिधी माधव गोटमवाड
कंधार तालुक्यात मागील दहा ते पंधरा दिवसापासून कंधार शहरासह ग्रामीण भागात साथीच्या आजाराने डोके वर काढले असून ताप,सर्दी, खोकल्यासह डोळे लाल होणाऱ्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे साथीचे आजार नागरिकांना बेजार करीत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे पावसाळा आला की वेगवेगळी साथीचे आजार वाढतात जुलाब, उलट्या,पोटदुखी,ताप,सर्दी, खोकला या आजारामुळे अनेक जण त्रस्त होत आहेत
रुग्णांचे डोळे लाल होणे चिपडणे तसेच डोळ्यावर सूज येणे या आजारात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे डोळे चिपडणे किंवा लाल होणे असे झाल्यास संबंधित रुग्णाने डोळ्यासाठी काळ्या गॉगलचा वापर करावा डोळ्याला जास्त वारे लागू नये यासाठी बाहेर फिरणे टाळावे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डोळ्याची काळजी घ्यावी
कॉलम
साथीच्या आजारांची अशी घ्या काळजी..
पाणी गरम करून पिणे योग्य प्रोटीनयुक्त आहार घेणेगरोदर माता वृद्ध दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे डेंगू आणि मलेरिया होऊ नये यासाठी मच्छरदाणी लावून झोपणे घरात डास मारण्याची औषधे ठेवावीत खिडक्या व दरवाजांना जाळी लावावी कचऱ्याची विल्हेवाट लावावी पूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे घालावे घरातल्या टाक्या साठवणुकीची भांडी झाकून ठेवावीत पाणी उकळून प्यावे बाहेरील उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्यामुळे डोळ्याला होणारे इन्फेक्शन वाढले आहे
डॉकटरांचा घ्या सल्ला…
सध्या Canjunctivitis चे रुग्ण आढळून येत आहेत,दहा ते पंधरा दिवसांपासून डोळ्याची सात सुरु आहे.वातावरणातील बदलामुळे डोळ्याचे व्हायरल इन्फेक्शन वाढत आहे,डोळे लाल झालेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने ड्रॉप किंवा औषधी घ्यावी – *डॉ.लक्ष्मीकांत पेठकर*
जनरल फिजिशियन
(त्वचा,मुळव्याध,वातरोग विशेष)