
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : कंत्राटदार असोसिएशनच्या कार्यकारिणी निवडीची सभा बुधवारी (ता.२६) नगरपालिकेच्या कंत्राटदार कक्षात घेण्यात आली असून ज्येष्ठ कंत्राटदार संजय सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या नगरपालिकेच्या कंत्राटदार असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली.यात असोसिएशनच्या अध्यक्षपदी गजानन चौधरी उपाध्यक्षपदी मयूर अंधारे तर सचिवपदी गजानन विजेकर आणि सदस्य म्हणून देवानंद टांक,अब्दुल अजहर अब्दुल हफिज यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आणि असोसिएशन च्या चांगल्या कामाची अपेक्षा करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी कंत्राटदार गणेश देशमुख,भगवंत नेवारे,संजय सरोदे,संदीप देशमुख
दिलीप धुळे,राहुल चौधरी,नरेश रसे,राजू आकोटकर,प्रशांत भावे,ऋषिकेश शिंगणे,सुरेंद्र हाडोळे,रिजवानभाई,श्रीकांत जुनघरे,चंद्रमणी शिरोळे,निहालभाई,किस्मतभाई,नदीमभाई,कृष्णा हंतोडकर यांची उपस्थिती होती.