
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा सुरेश ज्ञा. दवणे
जालना मंठा..महाराष्ट्र राज्याचे माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर साहेब यांनी काल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना भेटून निवेदनाद्वारे तर आज विधानसभेच्या सभागृहात औचित्याच्या मुद्द्याद्वारे मंठा तालुक्यातील बरबडा-आकणी, खोराड सावंगी आणि लिंबेवडगाव-पाटोदा या लघु तलावांचे काम अद्यापही अपूर्ण असून सदरील धरणाचे कामकाज पूर्ण करणे बाबत मागणीचा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर प्रलंबित असणे, जमिनीचा, घरांचा मावेजा तथा कंदरभरणीसह इतर बाबींना निधी न मिळणे, सदरील तिन्ही कामांच्या प्रस्तावामध्ये नव्याने प्रशासकीय मान्यता व मंजुरी देऊन सदरील धरणांचे कामकाज पूर्ण करणेबाबत तात्काळ करावयाची कार्यवाही व सदरील धरणासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची प्रशासकीय मान्यता देण्याची गरज विधानसभा सभागृहाच्या निदर्शनास आणून देत निधीची मागणी जोरदार लावून धरली या बरोबर बरबडा आकणी या धरणाचे काम अद्यापही अपूर्ण असून मागील सदरील धरणाचे कामकाज पूर्ण करणे बाबत मागणीचा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर प्रलंबित असणे, शासनाने सदरील प्रस्तावामध्ये नव्याने प्रशासकीय मान्यता व मंजुरी देऊन सदरील धरणाचे कामकाज पूर्ण करणेबाबत तात्काळ करावयाची कार्यवाही व सदरील धरणासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर साहेब यांनी आज विधानसभेच्या सभागृहात औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केली. या वेळी आकनी येथील जमिनी व घरे संपादित केली असून त्याचा मावेजा आजपर्यंत तेथील नागरिकांना मिळाला नसल्याची खंत आमदार लोणीकरांनी व्यक्त करत लिंबे वडगाव च्या पुनर्वसन करण्याची मागणी आक्रमकतेने लावून धरत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याची विनंती केली.