दै.चालु वार्ता अहमदपूर प्रतिनिधी
विष्णु मोहन पोले
अहमदपूर :-सतत पडणारा पाऊस, सर्वर प्रोब्लेम आणि खोळंबलेली वाहतूक या मुळे अनेक शेतकरी विमा भरण्यापासून वंचित प्रधानमंत्री किसान फसल योजना ही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणारी योजना एक जुलैपासून सुरू झाली असली तरीही अनेक शेतकरी विमा भरण्यापासून वंचित आहेत पूर्ण लातूर जिल्ह्यात हीच अवस्था आहे .सविस्तर बातमी अशी की शासनाने दिलेल्या निर्णयानुसार एक जुलैपासून विमा भरण्यासाठी ऑनलाईन सेंटरवर ,माही ई सेवा केंद्र वर असलेली तुंबळ गर्दी बघता त्यामध्ये सर्वरचा होणारा प्रॉब्लेम आणि सतत पडणार मुसळधार पाऊस ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वाहतूक खोळंबली असून त्यांना विमा सेंटरवर जाऊन विमा भरता आला नाही दरवर्षीच्या आकडेवारीनुसार यावर्षी विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रमाणामध्ये घट झाली आहे याचे एकमेव कारण हे आहे की ज्या पोर्टल साइटवर विमा भरायचा आहे ती पोर्टल साईट बंद चालु होत आहे मागच्या शनिवार पासून तर पूर्ण सर्वर प्रोब्लेम मुळ साईट ओपनच होत नाही आणि त्याचा सर्वर हे सतत एरर दाखवत असल्यामुळे अनेक ऑनलाईन सेंटर वाल्याची आमचा संपर्क झाला असता त्यांच्या बोलण्यातून हेच दिसून येत आहे की आम्ही सर्वर प्रॉब्लेम मुळे योग्य पद्धतीने विमा भरू शकलो नाही तरी सर्व शेतकऱ्यांची शासनाला विनंती आहे की त्यांनी विमा भरण्यासाठी ची शेवटची 31 जुलै तारीख आहे त्याच्यामध्ये बदल करून विमा भरण्यासाठी आम्हाला तारीख वाढवून द्यावी…