
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे…
देगलूर : देगलूर तालुक्यातील येरगी येथे चालुक्य कालीन शिलालेख भेटल्यानंतर तेथील प्राचीन मंदिरांचे,बारवांचे व विहिरीचे जीर्णोद्धार लवकरच करण्यात येईल अशी घोषणा जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी 26 एप्रिल च्या येरगी भेटीमध्ये जाहीर केले होते.तसेच याकामी पुरातत्व अभ्यासक डॉ.कामाजी डक,नायब तहसीलदार मकरंद दिवाकर ,नांदेड इंटक चे सुरेश जोंधळे, गजानन सुरकूटवार यांनी येरगी येथे वारंवार भेट देऊन जिल्हाधिकारी यांना येथील चालुक्य कालीन संपदेची माहिती दिली होती.
यानंतर आज रविवार 30 जुलै रोजी नांदेड जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी नांदेड येथील पदभार घेतल्यावर दहा दिवसाच्या आतच देगलूर तालुक्यातील येरगी येथे भेट देऊन तेथील चालुक्य कालीन शिलालेख,शिवमंदिर, केशवेश्वर मंदिर,सरस्वती मंदिर यांची पाहणी करून दर्शन घेतले.तदनंतर येथील चालुक्य कालीन दोन बारव,18 विहिरी यांची पाहणी केली आणि या विहिरी व बारव हे प्राचीन जलव्यवस्थापनेचा उत्कृष्ट नमुना असल्याचे सांगत आज पुन्हा या जलव्यवस्थापनेचा अभ्यास होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
त्यानंतर मीनल करनवाल यांनी संपूर्ण येरगी गावाची,शाळेची पाहणी करून समाधान व्यक्त केले.तसेच शाळेचा परिसर पाहून शाळेचे कौतुक केले व शाळेच्या परिसरात वृक्षारोपण केले.
गावातील रस्ते,स्वच्छता,
पाणीपुरवठा,गावाच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे व गावचा विकास पाहून त्यांनी सरपंच संतोष पाटील यांचे कौतुक करून अभिनंदन केले.व गावाच्या विकासासाठी व चालुक्य कालीन मंदिरांच्या जीर्णोद्धार साठी शक्य तेवढी मदत करण्याचे आश्वासन दिले.
येरगी ला हेरिटेज व्हिलेज करण्यासाठी सर्वतोपरी मदत करू असेही त्यांनी सांगितले.
तसेच गावाच्या विकासासाठी सरपंच ,ग्रामसेवक,शिक्षक,ग्रामस्थांनी एकत्र येऊन काम करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
तसेच त्यांनी गावातील लहान मुले, जेष्ठ नागरिकांशी वार्तालाप केला.
यावेळी नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचे सरपंच संतोष पाटील यांनी चालुक्य कालीन सरस्वती देवीची प्रतिमा देऊन सन्मान केला. यावेळी देगलूर पंचायत समितीचे बीडीओ शेखर देशमुख, सरपंच संतोष पाटील,ग्रामविकास अधिकारी राजेश तोटावाड, गणेश कोकणे, सह सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते.