
दैनिक चालू वार्ता
छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधि :अन्वर कादरी
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (सांगता), मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव शुभारंभ तसेच महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग अंतर्गत महसूल सप्ताह या निमित्ताने मौजे गांधीली गट क्रमांक २९८ मध्ये ७५००० वृक्ष लागवड करण्यात येणार असून त्याचा शुभारंभ आज मंगळवारी महसूल दिनी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
एसव्हीटीएफ फाउंडेशन, स्टरलाईट, आयडीबीआय बँक व ग्रामपंचायत कार्यालय गांधेली यांच्या संयुक्त विद्यमाने ७५००० गांधेली गट क्रमांक २९८,साई टेकडी च्या बाजूला वृक्षारोपण करण्यात येत आहे. या वृक्षारोपण लागवड उपक्रमाचा शुभारंभ.
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार विजय चव्हाण, नायब तहसीलदार कैलास वाघमारे, परेश चौधरी बीडीओ ढोकणे, ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसेवक, सर्व तलाठी व मंडळ अधिकारी सरपंच गांधेली, नागरिक,आयडीबीआय बँक, एसव्हीटीएफ चे पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी तलाठी विनोद मुळे, मंडळ अधिकारी कल्याण वानखरे व ग्रामसेवक यांनी परिश्रम घेतले.