
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे: केसनंद ता. हवेली जिल्हा पुणे येथे मार्ग फाऊंडेशनच्या
सहकार्याने आता पेरेंत दीड हजार झाडांची लागवड स्वयंसेवकांच्या मदतीने करण्यात आली आहे.दिनांक ११ ऑगस्ट २०२३ रोजी केसनंद गावामध्ये मार्ग फाऊंडेशन , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित,बी जे एस कॉलेज वाघोली राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रामपंचायत केसनंद यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व पंचप्रण शपथ कार्यक्रम संपन्न झाला.फक्त वृक्ष न लावता त्याचे संगोपनही करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत केसनंद व गावकऱ्यांनी घेतलेली आहे. यासाठी डोंगरावर पाण्याच्या टाक्या बसवण्यात आल्या आहेत.या वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी मार्ग फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त,भारत सरकार कु.मनोज गुंजाळ, प्राचार्य डॉ.संजय गायकवाड तसेच निवृत्त सेना अधिकारी कॅप्टन अनिल सातव,सुरेश साळुंखे,सरपंच दत्ता हरगुडे,मार्ग फाऊंडेशनचे मुख्य कार्यक्रम समन्वयक कु.आशुतोष खाडे,कु.शिवम कोल्हे, प्रिंट मीडिया प्रमुख कु.अजिंक्य फरकाडे ,सहकारी कु.विकास यादव,कु.साक्षी नेहरकर,कु.प्रणित गोळे व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी,स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते..