
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
नादेड (देगलूर):महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो पोर्टलच्या माध्यमातून बातमीच्या डिस्प्लेला लावून सन २०२१ वर्षातील शेतकऱ्यांचा पिक विमा ५० हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला असल्याच्या दिशा भूल करणाऱ्या ऑनलाईन बातम्या प्रकाशित करण्यात येत असल्यामुळे शेतकरी पैशाच्या अशे मुळे दररोज बँकेला जाऊन खात्याची चौकशी करत आहेत
बँक खात्यात कसल्याच प्रकारचे पैसे जमा झाले नसल्यामुळे सदरच्या खोट्या बातम्या ऑनलाईन प्रकाशितकरणाऱ्या पोर्टला आळा बसवा असे शेतकरी गटातून बोलल्या जात आहेशेतकऱ्यांच्या बँक खात्यात सन २०२१ सालातील पीक विमा ५० हाजार रुपये जमा करण्यात आला असल्याच्या बातम्या पोर्टलच्या माध्यमातून दिशाभूल करणाऱ्या ऑनलाईन बातम्या प्रकाशित होत असल्यामुळे शेतकरी बँक खात्यातील रक्कमेची चौकशी करण्यासाठी गर्दी करत असल्यामुळे पोर्टलच्या माध्यमातून प्रकाशित होत असलेल्या व दिशाभूल करणाऱ्या बातमी लावू नयेत असा सवाल शेतकऱ्यानी केला आहे
शासन सन २०२१चा पिक विमा कुठेच जाहीर केले नसताना सुद्धा पिक विमा कंपनी कडून ही तसे जाहीर केले नसताना सुद्धा पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात ५० हजार रुपये जमा झाले असल्याच्या खोट्या बातम्या ऑनलाइनच्या माध्यमातून प्रकाशित होताना दिसत आहेत व सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रुपवर वायरल होताना दिसून येत आहेत.