
दै.चालु वार्ता
परंडा प्रतिनिधी धनंजय गोफणे
परंडा आज दि१४ ऑगष्ट कै. महारुद्र बप्पा मोटे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय(प्रेरणा) येथे संस्थेच्या वतीने शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व विद्यार्थ्यांना मोफत स्कुल बॅग चे वाटप संस्थेचे संस्थापक मा.ऍड.श्री.रणजितदादा मोटे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.डॉ.सोनल भाभी यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच यासोबत कार्यक्रमासाठी आमंत्रित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ही गुणवंतांचा गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस परंडा तालुका अध्यक्ष ऍड.संदीप पाटील तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, माजी नगराध्यक्ष नसीरभाई शहाबर्फीवाले, ज्येष्ठ नेते, ऍड.सुभाष वेताळ, नगरसेवक जावेद पठाण, भाऊसाहेब मोरे, नंदू शिंदे, श्रीहरी नाईकवाडी, घनशाम शिंदे, सलीम हन्नूरे, हनुमंत गायकवाड, सौ.राखीताई देशमूख, सौ.गायकवाड, प्राचार्य प्रा.जाधव सर, प्रा.शरद झोंबडे, प्रा.बाबुराव काळे, प्रा.पटेल सर, प्रा.अविनाश अटूळे, प्रा.जगताप सर, सिद्धार्थ बनसोडे तसेच इतर शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.