
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
नांदेड (देगलूर):आज दिनांक 14 आँगस्ट 2023 रोजी दीपक भाऊ रामपूरकर यांचे चिरंजीव दिव्यांशू यांचा वाढदिवस लहुजी साळवे निराधार निरार्षित आनाथ बालकाश्रम वाडीपाटी नांदेड येथे सहकुटुंब जाऊन अनाथ मुलांसोबत खाऊचे व ब्लॅंकेट चे वाटप करून अनाथ मुलांच्या सोबत संपूर्ण दिवस सहकुटुंब राहून आपल्या एकूलत्या एक मुलाचा वाढदिवस साजरा करणारे दिपकभाऊ रामपुरकर हे महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील एकमेव असे उद्योगपती असतील ज्यांनी अनाथ बालकासोबत एकुलता एक मुलाचा वाढदिवस साजरा केला व वाढदिवस साजरा करत असताना संस्थेचे अध्यक्ष मा.घाटे सर उपस्थित होते व दीपक भाऊ रामपूरकर यांनी आपल्या मनोगतामध्ये बोलत असताना असे सांगितले की समाजातील प्रत्येक दानशुर व्यक्तींने आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा वाढदिवस या ठिकाणी येऊन साजरा करावा जेणेकरून ज्यांना आई-वडील नाहीत अनाथ निराश्रीत बालकांना त्यामुळे एक प्रकारची कौटुंबिक भावना निर्माण होईल व आपल्या कुटुंबातील बालकांना मध्ये सामाजिक जाणीव निर्माण होईल व त्यांची समाजाप्रतीची भावना निष्ठा कर्तव्य म्हणून ते येणाऱ्या काळात सामाजिक कार्याकडे मोठ्या प्रमाणात वळतील म्हणून प्रत्येक व्यक्तीने समाजातील गरीब असो श्रीमंत असो त्यांनी आपला वाढदिवस साजरा करत असताना जे समाजाच्या बाहेर फेकल्या गेलेल्या वर्ग आहे अशा घटका सोबत आपण सदैव दरवर्षी घरातील प्रत्येक व्यक्तीचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करणार असा या ठिकाणी निर्धार केला आहे.