
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड (बिलोली) :- बिलोली तालुक्यातील केसराळी येथील ग्रामपंचायत कार्यालयातर्फे सन्माननिय सरपंचांनी १५ आॅगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त व आझादी का अमृत महोत्सव ७६ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल . स्वातंत्र्य सैनिकांना सन्मान मिळावा म्हणून स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्याचा सन्मान करण्यात आला व त्यांच्या हस्ते थोर नेत्यांची आणि राष्ट्रध्वजाची पुजा करण्यात आली. त्याबद्दल अभय केसराळीकर यांनी गावकऱ्यांचे व ग्रामपंचायतीचे मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत केसराळी येथील सर्व नागरिकांतर्फे आपण जो स्वातंत्र्यसैनिक यांचे पाल्य म्हणून सन्मान केला आहात त्याबद्दल मी सर्व नागरिकांचा आजन्म ऋणी राहीन.
. जन्माने त्या थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशावळीत आमचा जन्म झाला असला तरी केवळ जन्माने त्यांच्यासारखे महान कार्य घडेलच असे नसते. तरीही मी सत्कारास पात्र नसतानाही पाल्य म्हणून माझ्याच हृद्यस्मृती जागवलीत याबद्दल मी आपला सर्वसामान्य नागरिक म्हणून आजन्म ऋणी राहीन.
अभय केसराळीकर.सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, शिक्षक, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.