
दैनिक चालू वार्ता
नांदेड दक्षिण तालुका प्रतिनिधी गोविंद मोरे
नांदेड दक्षिण पूनेगाव ता.नांदेड येथील अल्पभूधारक शेतकरी संभाजी बालाजी पुयड यांनी पूर्वीची पटियाला आताची एस.बी.आय. बँके कडून 2013 मध्ये पीककर्ज घेतले होते दोन वेळा नूतनीकरण केले नंतर ते थकीत झाले. त्यानंतर सरकारची दोन वेळा कर्ज माफी आली आणि दोन्ही वेळेत त्यांना कर्ज माफीचा लाभ मिळाला नाही.आपल्या सोबत कर्ज घेतलेल्या सर्वांना कर्ज माफी होते मला का होत नाही.या साठी त्यांनी मुखयमंत्र्यां पासून सर्वांना पत्र पाठवले परंतु कुणी ही दाद घेतली नाही शेवटी निराश झालेल्या संभाजी पुयड यांनी 15ऑगस्ट 2023 रोजी जिल्हाधकारी कार्यालया समोर आत्महत्त्या करण्याचे निवेदन दिले . आम् आदमी पार्टी नांदेड जिल्हा सचिव डॉ अवधुत पवार यांनी या प्रकरणी मध्यस्थी केली व पोलिस अधिकारी आणि बँक अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन या मध्ये तोडगा काढला. तीन लाखा पेक्षा अधिक असलेले कर्ज फक्त अडूसस्ट हजार रुपयांवर आणले आणि तडजोड पूर्ण केली आणि 15ऑगस्ट ला होणारी आत्महत्या टाळण्यात यश आले.
या प्रकरणी बँक मॅनेजर मोहित गुप्ताजी ॲड.ज्ञानेश्वर पंडित पोलिस निरक्षक जगदीश भांडारवार पोलिस कर्मचारी बालाजी दंतापल्ले आणि चंद्रकांत बिरादार यांनी महत्वाची भूमिका बजावली.
या साठी आम् आदमी पार्टी चे जिल्हा सचिव डॉ अवधुतराव पवार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.