
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : अंजनगाव सुर्जी शहरातील नगरपरिषद कार्यालय अंतर्गत येणारी अनेक कामे प्रलंबित असून (दि.२४) गुरुवार रोजी शिवसेना कार्यकर्ते मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात धडकले.
शहरातील नागरिकांच्या समस्यांचे तात्काळ निवारण न केल्यास आम्ही हजारोंच्या संख्येने मशाल मोर्चा काढून नगरपरिषद कार्यालावर आणू आणि त्याउपरांत काही अघटीत घडल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार नगरपरिषद प्रशासन राहील असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख राजू आकोटकार यांनी मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांना म्हटले.यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख राजू आकोटकार यांच्या नेतृत्वात शिवसेना कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांना शहरातील नागरिकांच्या समस्ये संबंधित निवेदन सादर केले.
निवेदन देतेवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख राजू आकोटकार,गजानन विजयकर,गजानन चौधरी,गणेश देशमुख,दिलीप धुळे,रवी नाथे,अभिजीत भावे,शरद फिस के,संदीप पिंगे गुणवंत सोरमारे,पंकज मंडवे,अफरोश सौदागर,अदील खतीब,शुभम कहार,नागेश गोळे,गजानन फाटे,मयूर रॉय,नितीन त्रिवेदी,शुभम भोंडे,राहुल ताडे,गजानन चौधरी,सुरेंद्र हाडोळे,कैलास वानखडे,रुपेश सरोदे,राहुल चौधरी,संदीप देशमुख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.