
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : अंजनगाव सुर्जी तहसील अंतर्गत पार पडलेल्या कोतवाल पदभरतीमध्ये घोळ झाल्याची चर्चा सध्या शहरांमध्ये चांगलीच रंगलेली आहे आणि तीन विद्यार्थ्यांनी कोतवाल पदभरती वर आक्षेप नोंदविल्याचे समोर आले आहे.
सदर पद भरती २७ ऑगस्ट रविवार रोजी ऑफलाईन पद्धतीने हरणे महाविद्यालय येथे पार पडली आणि त्याचा निकाल २९ ऑगस्ट मंगळवार ला अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयाच्या बोर्डावर जाहीर करण्यात आला.या कोतवाल पद भरती करिता पार पडलेल्या परीक्षेदरम्यान अधिकारी वर्गाने ८ ते १० लाखांमध्ये परीक्षा होण्यापूर्वीच साटेलोटे केल्याची चर्चा असून कोतवाल पद भरतीवर काही विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदविला आहे.
आता या कोतवाल पद भरतीमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेवर कोतवाल पदाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला खरंच न्याय मिळणार का? कोतवाल पदाच्या पदभारती अगोदरच साटेलोटे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शासन कारवाई करणार का? याकडे सर्व कोतवाल पदाच्या पद भरतीला बसलेल्या विद्यार्थ्यांसमवेत अंजनगाव सुर्जी तालुक्याचे लक्ष वेधले आहे.