
राखी ही फक्त रक्तातील नात्यातील भावालाच बांधली जाते असे नसून आपल्या रक्षणकर्त्या प्रत्येक भावासाठी आहे – श्री संदिपान सोनवणे ( पोलीस निरीक्षक )
दैनिक चालु वार्ता
रायगड म्हसळा प्रतिनिधी अंगद कांबळे
म्हसळा – न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा येथे प्राचार्य श्री हाके पी एल सर यांच्या संकल्पनेतून एक राखी रक्षण कर्त्यांची हा अभिनव उपक्रम साजरा करण्यात आला, म्हसळा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री संदीपान सोनावणे साहेब यांच्या हस्ते शिक्षण महर्षी परमपूज्य डॉ. बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे प्रथम पूजन करण्यात आले, विद्यालयातील कलाशिक्षक श्री बंडगर एस टी, व श्री कामडी व्ही के यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या कला कार्यानुभव अंतर्गत कार्यशाळा माध्यमातून विविध प्रकारच्या सुंदर अशा राख्या तयार करून घेतल्या या तयार केलेल्या राख्या देश सीमेवरती लढणाऱ्या सैनिकांसाठी पाठविण्यात आल्या तसेच देशाबरोबरच घरापर्यंत संरक्षण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचाही सन्मान व्हावा या उद्देशाने म्हसळा पोलीस स्टेशन मधील पोलीस निरीक्षक श्री संदीपान सोनवणे साहेब व सर्व स्टाफ यांचेही राखी बांधून औक्षण करण्यात आले, रक्षाबंधनाच्या पवित्र सणांमध्ये राखी ही फक्त रक्तातील नात्यातील भावालाच बांधली जाते असे नसून आपल्या रक्षणकर्त्या प्रत्येक भावासाठी आहे असे मत श्री सोनवणे साहेब यांनी व्यक्त केले, असे अभिनव उपक्रम बापूजींच्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्येच होतात असा आत्मविश्वास व्यक्त केला. पोलीस करत असलेल्या कार्याचा सन्मान खऱ्या अर्थाने झाला असल्याचे मत व्यक्त केले, त्यांनी सर्वांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असल्याचे सांगितले. रक्षाबंधनाच्या या कार्यक्रमाने पोलीस बंधू आनंदुन गेल्याचे दिसून आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक श्री मोरे एच बी यांनी केले व आभार श्री गायकवाड एन. एस यांनी मानले या कार्यक्रमावेळी पोलीस नाईक पोळ, पर्यवेक्षक गायकवाड सर, जेष्ठ शिक्षक इ सी पाटील, कलाशिक्षक बंडगर एस टी, सौ शिर्के मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर उपस्थित होते