
सहाय्यक निबंधक यांचे शेतकर्यांना आवाहन…
दैनिक चालु वार्ता अमोल आळंजकर
गंगापूर ( प्रतिनिधि ) गंगापुर तालुक्यातील सावकार ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतजमीनी तसेच ईतर मालमत्ता सावकारांनी बळजबरी व धमकाऊन बळकावली असेल तर अशा पीडीत शेतकर्यांनी सावकारांना न घाबरता सावकारा विरोधात गंगापूर सहाय्यक निबंधक कार्यालयात तक्रार दाखल करावी असे आवाहन गंगापूर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सहाय्यक निबंधक तालुका अधिकारी यांनी केले आहे तसेच सावकारी कायदा २०१४ साली काढण्यात आला आहे परंतु शेतकरी सावकारांना घाबरत असल्यामुळे सावकारांविरोधात तक्रार दाखल करण्यास शेतकरी पुढे येत नाही यामुळे दिवसेंदिवस सावकारांचे धाडस वाढत आहे परंतु संबंधित सावकारांना धडा शिकविण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे येऊन तक्रारी दाखल करावे आपल्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावे असे आवाहन सहाय्यक निबंधक अधिकारी यांनी केले आहे,
अन्याय सहन करु नका खासगी सावकारांनी शेतकर्यांची शेतजमीन तसेच ईतर मालमत्ता जबरदस्ती हडपली असेल तर पीडीत शेतकर्यांनी टोकाचे पाऊल उचलु नये आपण दाद मागा निश्चितच न्याय देण्यात येईल असे आवाहन गंगापुर चे सहाय्यक निबंधक यांनी केले आहे…