
देगलूर शिवसेना तालुका महिला अध्यक्ष सविता चप्पलवार यांची निवड…
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी नांदेड (देगलूर): पुढील लोकसभा व विधानसभेच्या पूर्वतयारी साठी विविध पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते विविध पक्षामध्ये प्रवेश करताना दिसून येत असताना देगलूर येथील सामाजिक कार्यकर्ते सविता चप्पलवर व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट टाचे शहर सचिव धनाजी जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन देगलूर तालुक्यातील मरकेल सर्कल व शहापूर सर्कल मधील अनेक कार्यकरते शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केले. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर सचिव पदाचा राजीनामा देऊन धनाजी देशमुख यांनी असंख्य कार्यकर्ता समवेत बाळासाहेबांच्या शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार संपर्क प्रमुख आनंदराव जाधव नेतृत्वाखाली जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांच्या हस्ते असंख्य कार्यकर्ते समवेत देगलूर येथिल गोविंद माधव मंगल कार्यालयात शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केला पक्षात होणार्या एकाधिकारशाही पणाला कंटाळून आज असंख्य कार्यकर्ते समवेत सविता चप्पलवार व धनाजी जोशी यांनी पक्ष प्रवेश केला यावेळी संपर्क प्रमुख आनंदराव जाधव साहेब जिल्हाप्रमुख उमेश मुंडे जिल्हाप्रमुख आनंदराव बोंडारकर युवा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख आकाश रेड्डी याताळकर व महिला जिल्हाप्रमुख रत्नमाला मुंडे देगलूर शिवसेना तालुकाप्रमुख घाळप्पा अंबेसंगे शहरप्रमुख व्यंकट पुरमवार वैजनाथ आंधळे दिगंबर जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.