
शोतोकोन कराटे दो स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने गोल्डन बेल्ट चॅम्पियनशिप 2023-24 स्पर्धेला पुणेजिल्हयाकडून उत्तुंग प्रतिसाद 100 शाळा व 3500 स्पर्धकांनी लावली हजेरी…
दैनिक चालू वार्ता
पुणे शहर प्रतिनिधी विशाल खुणे
दि 27 ऑगस्ट (खराडी) पुणे
गोल्डन बेल्ट चॅम्पियनशिप 2023 महालक्ष्मी लॉन्स खराडी या ठिकाणी 26 व 27 ऑगस्ट दोन दिवस आयोजित करण्यात आली . त्यामध्ये स्पर्धेचे प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक प्रितमदादा खांदवे यांचे उपस्थिती लाभली दीप प्रजवल्याने प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात केली छोट्या गटापासून मोठ्या गटातील सर्व स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदविला कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी कोणास काही अडथळा येऊ नये याकरिता शोतोकोन कराटे असोसिएशनच्या वतीने डॉक्टर्स, हेल्थड्रिंक्स स्टॉल, हॉटेल्स इत्यादींची गोष्टीचे नियोजन पूर्णतः व्यवस्थित करण्यात आले होते .
स्पर्धेमध्ये सोने, चांदी याचे श्री गणेश प्रतिमा बक्षिसे, पुरस्कार ट्रॉफीज, गोल्ड, सिल्वर, ब्रांस मेडल सन्मानचिन्ह वाटप विजेत्यांना घोषित करण्यात आले
वाघोलीतील एसएनबीपी स्कूल, ऑर्बिट स्कूल, डॉक्टर मारी एवेंस धानोरीचा स्कूल या इतर शाळांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले .
उपस्थित सर्व स्पर्धक, पाहुणे, पालक, प्रेक्षक यांचे स्वागत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमितकुमार ठाकूर, उपाध्यक्ष विष्णू दहिरे, अक्षय सरोदे तसेच विकी पवार यांनी केले.
कार्यक्रमात बोलताना अमितकुमार ठाकूर यांनी मौलिक संदेश दिला की ते म्हणाले “इथे जमलेल्या सर्व उपस्थिताना पालकांना नम्र आवाहन आणि विनंती करतो की मुलांना कराटे क्षेत्रापासून दूर हटू देऊ नका, मुलांना खेळाप्रति उत्तेजन द्या मुलांना प्रेरणा द्या आणी मुलाना घडवून आपला भारत बलशाली बनवा यश हे आपल्याला येणारच . नेहमीच माझी सहकारी टीम सर्वजण कराटे याखेळास योग्य तो न्याय मिळावा यासाठी वेळोवळी ही स्पर्धा घेवुन सर्वांच्या दृष्टीक्षेपात घालत असतो कराटे खेळा ला न्याय मिळावा म्हणून इंटरनॅशनल लेवल सर्व संबंधितांना भेटून पाठपुरावा करीत आहोत असे ते म्हणाले तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की कराटे खेळाच्या सोबतच सर्वांनी राहत्या घराच्या दारात किमान एक वृक्ष लावण्याचा आणी त्याच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यावी . ते म्हणाले की माझे सर्व वृक्षमित्रांना सांगणे आहे़ की रस्त्यावरचे आपण झाडे पाहतो त्यांना जाहिरातीच्या करण्याच्या माध्यमातून लोकांनी सगळे खिळे ठोकलेले आहेत तसे केले नाही पाहिजे यासाठी एक जनजागृती करण्यात आली पाहिजे. या साठी आपण कार्यक्रम घेवू मुलाना आणी झाडांना देखील जपा देश आपोआप पुढे जाईल असे ते म्हणाले . या कार्यक्रमाच्या माध्यमातून “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” असा वृक्षारोपणाचा एक मौलिक संदेश दिला आणी आलेल्या पाहुण्यांचे आभार व्यक्त केले .
कार्यक्रमाला उपस्थिती :-
मा. प्रितम खांदवे सामाजिक कार्यकर्ते, अमितकुमार ठाकूर शोतोकोन कराटे दो स्पोर्ट असोसियेशन प्रेसिडेंट, विष्णू दाहिजे (शोतोकोन कराटे दो स्पोर्ट असोसियेशन वॉईस प्रेसिडेंट), बाळासाहेब कुसाळकर (दि गुड पिपल्स फौंडेशन जिल्हाध्यक्ष), अमजदभाई पठाण (सामाजिक कार्यकर्ते), पी.एस.पोतदार, सर्वजीत किराड वेदगन फौंडेशन, प्रचेतन पोतदार फाउंडर स्टेफिदरड, श्वेता पंकज एथोन एजुकेशन बियोन्द सिल्यबस डाइरेक्टर, अक्षय सरोदे, रोहित कदम, संकेत अग्रवाल, विकी पवार, सनी भत्ती, संजना कांबळे, रुशिकेश कसबे, अक्षय बनसोडे, गणेश वाघमारे, सागर ढवळे, अक्षय बनसोडे, अमर भोसले, सुशांत मोटे, प्रसाद साबळे, राहुल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजसेवक रोहित कदम यांनी केले…