
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड (लोहा) :- महाराष्ट्र शासन शिक्षण व क्रिडा विभाग मंत्रालय, मुंबई यांच्याकडून जून १९९५ ला मनकर्णा प्राथामिक शाळेला विनाअनुदान तत्वावर मान्यता दिली असून मा. शिक्षणाधिकारी (प्रा.). जि.प.नांदेड यांनी पत्र.क्र. जि.प.ना/शि.अ.प्रा ५ब/६०३९३/२०१६ रोजी केवळ इयत्ता ५ वी वर्गास विनाअनुदान तत्वावर मान्यता दिलेली असताना सदर शाळेने शिक्षण खात्याची परवानगी नसताना इयत्ता ६ व ७ वी चे वर्ग अनधिकृतपणे शैक्षणिक वर्षे २०१४ ते २०२२ पर्यंत चालवून विद्यार्थी, पालक व शिक्षण खात्याची दिशाभूल करून फसवणूक केली आहे. संबंधीतावर प्राथमिक शाळा संहितेतील नियम ७ अ नुसार शिस्तभंगाची उपाय योजना करणे योग्य राहिल. शाळा संहितेतील नियम ३.३ किंवा नियम ९७ च्या तरतुदीच्या आधिन राहून शिक्षण खात्याने कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु शिक्षण खात्याने याबाबत दुर्लक्ष केल्यामूळे संबंधीत शाळेने इयत्ता ६ वी व ७ वी च्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती (बढती) देवून इतर शाळेत प्रवेश देण्यासाठी बोगस व बनावट टिसी देवून विद्यार्थ्यांची व पालकांची फसवणूक केलेली आहे.सदरचे विद्यार्थी इतर शाळेत प्रवेश घेवून शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा देवून पुढील शिक्षण घेत आहेत. ही बाब विद्यार्थाच्या भविष्याच्या दृष्टीने अन्यायकारक असून हितावह नाही.जि.प. कार्यालयीन पत्र दिनांक १९/०८/२०१९ रोजी सदर शाळेच्या चौकशीसाठी शिक्षणविस्तार अधिकारी, लोहा यांना चौकशीचे आदेश दिले असताना मनकर्णा प्रा. शाळेची चौकशी केली असता. शैक्षणिक वर्षे २०२१-२२ मध्ये इयत्ता ६ वी वर्गात २४ विद्यार्थी व इयत्ता ७ वी वर्गात २१ विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याची बाब निदर्शनास आली आहे. सदरील विद्यार्थ्याच्या बनावट टीसी. मुख्याध्यापकांनी इतर शाळेस दिल्याचे मा. शिक्षणविस्तार अधिकारी साहेब, लोहा यांचे चौकशी अहवालातील कॉलम ८ मध्ये लेखी नमुद केलेले दिसते.शिक्षणविभागाने दिलेले आदेश मुख्याध्यापकांनी त्या आदेशास केराची टोपली दाखवलेली आहे. संबंधीत शाळेतून परिसरातील इतर शाळेत अनाधिकृत टिसीच्या आधारे प्रवेश दिलेला आहे. १. गाडगे महाराज हायस्कूल लोहा (०६), २. विश्वनाथराव नळगे हायस्कूल लोहा (२६), ३. प्रतापराव हायस्कूल सुनेगांव (०३), ४. संत गाडगे महाराज प्राथमिक शाळा लोहा (०३),५. मा.आश्रम शाळा विठ्ठल नगर लोहा (०६), या शाळेत इयत्ता ६ वी ते ८ वर्गात प्रवेश देवून विद्यार्थ्यांना वर्गोन्नती (बढती) दिलेली आहे.शिक्षणाधिकारी (प्रा.) जि.प.नांदेड यांचे आदेश जि.प.ना./शि.वि.(प्रा.) ५ब/५३२८/२०२०-२१ दिनांक १० नोव्हेंबर २०२१ रोजी संबंधीत मुख्याध्यापकास त्यांच्या शाळेतील गैरवर्तनामूळे कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे. तरीही त्या नोटीसीचे सुव्यवस्थित उत्तर संबंधीत मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकारी (प्रा.) जि.प.नांदेड यांना सादर केलेले नाही. ही गंभीर बाब आहे. व शिक्षण विभाग या बाबी कडे दुर्लक्ष करीत आहे.सदरील मनकर्णा प्राथमिक शाळा, लोहा या शाळेतील इयत्ता ६ वी व ७ वी वर्गात प्रवेश घेतलेल्या व शैक्षणिक वर्षे २०१४-१५ ते २०२१-२२ पर्यंचे सर्व अनाधिकृत अभिलेख १.प्रवेश निर्गम पंचिका, २. गुणदान रजिस्टर, ३. विद्यार्थी हजेरी व शिक्षक उपस्थिती पट, ४.बनावट टिसी दिलेले रजिस्टर आपल्या ताब्यात घेवून संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अन्यथा अम्हास वरील संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्याची लेखी परवानगी देण्यात यावी.असी मागणी अॅड.विनायकराव कदम पाटील रा.अभिनवनगर कंधार जि.नांदेड यांनी केली आहे.