
तक्रारदार शेतकऱ्यांना पोलीस ठाण्यात अनेक प्रश्नांना द्यावे लागते तोंड…
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा /सुरेश ज्ञा. दवने जालना (मंठा )
एकीकडे दुष्काळाची सावट शेतकरी पदरमोड करून शेती साहित्याची खरेदी करतात. त्यातच सध्या पावसाची दडी शेतीमालाला अपेक्षीत दर नसताना शेतकरी हवालदिल आहे. सिंचनाची सोय असणारे शेतकरी विहिरीतील उपलब्ध पाण्यावर थोडाफार भाजीपाला व सोयाबीन, कापूस,हळद तुर इत्यादी पीक लागवड केली आहे मात्र पावसाने महिनाभर उघडीप दिल्यामुळे जनावरांना पिण्याचे पाजण्यासाठी पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु असतांना अशा परिस्थितीत चोरट्यांनी कृषीपंप चोरून शेतकऱ्यांना जेरीस आणले आहे.
शेतीच्या सिंचनासाठी विहिरी, तलाव, नद्या, कालवे यांच्यावर लावलेले कृषीपंप चोर रातोरात
पळवित आहेत. हे मोटारपंप इतर जिल्ह्यातील दुर्गम गावांमध्ये निम्म्या किमतीत विकले जात असल्याची माहिती आहे. यामध्ये काही टोळ्या सक्रिय असल्याची चर्चा गावांगावामध्ये आहे.
कृषिपंप चोरीची तक्रार घेऊन
शेतकरी जेव्हा पोलिस ठाण्यात पोहोचतात, तेव्हा त्यांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. त्यांच्याकडून कृषि विद्युत पंप खरेदीचे पक्के बिल मागितले जाते. बहुतांश शेतकरी बिले सुरक्षितपणे ठेवत नाहीत. जुन्या पंपांच्या बाबतीत बिल क्वचितच मिळते. त्यामुळेच अधिकांश चोरीच्या घटना पोलिसांपर्यंत पोहोचत नाहीत. जे शेतकरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जातात, त्यांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते.अशाच घटनाचे साक्षीदार तालुक्यातील मेसखेडा येथील शेतकरी एकनाथ काकडे यांच्या शेतातील विद्युत पंप चोरी गेल्याची तक्रार घेऊन गेले असता मंठा पोलीस ठाण्याचे अंमलदार यांनी टाळाटाळ केली आहे असे ते सांगत आहे. मात्र अशा परिस्थितीत चोरट्यांनी कृषीपंप चोरूचा सपाटा लावून शेतकऱ्यांना जेरीस आणले आहे.आशा परिस्थितीत पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन चोरट्यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे