
ना. श्री सुधीरभाऊ मनगुंटीवार यांच्याकडे मराठवाड्याच्या विभागीय बैठकीत आमदार बबनराव लोणीकर यांची आग्रही मागणी…
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा/सुरेश ज्ञा. दवणे जालना
माझ्या परतुर विधानसभा मतदार संघातील मौजे आष्टी ता. परतुर जि. जालना येथे महाराष्ट्रातील पहिली शेतकऱ्यांची औद्योगिक वसाहत (MIDC) उभारण्यात आली असुन त्यासाठी ३०० कोटी रुपयांचा डी. पी. आर. तयार करण्यात आला होता शेतकऱ्यांच्या या औद्योगिक वसाहतीत बटाट्या पासून चिप्स बनवणे, केळी पासून चिप्स बनवणे, सोयाबीय वडा बनवणे, दालमिल, मसाला उत्पादन, अगरबत्ती निर्मिती, टोमोटो सॉस बनवणे, गुळ युनिट उभारनी या सह अनेक उद्योगांची उभारणी करण्यात आलेली आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्गा लगत २० एकर जागेवर ३० कंपण्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांच्या या औद्योगिक वसाहती करिता वीस कोटी रुपये निधीचा मागणी प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित असून त्यास अद्याप मंजुरी मिळाली नाही. यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मराठवाडा विभागीय बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी याबाबतीत जिल्हाधिकारी जालना यांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्याकरिता शेतकरी बांधवांचे हित लक्षात घेऊन निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी आज छत्रपती संभाजी नगर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मंत्री वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय ना. श्री सुधीरभाऊ मनगुंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित मराठवाडा विभागीय बैठकीत केली आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित या मराठवाडा विभागीय बैठकीस रोजगार हमी आणि फलसंवर्धन मंत्री नामदार संदीपान भुमरे, सहकार मंत्री नामदार अतुलजी सावे, महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ नाना बागडे यांच्यासह मराठवाड्यातील खासदार आमदार आणी मराठवाडा विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती.
यावेळी आमदार बबनराव लोणीकर पुढे बोलताना म्हणाले की मंठा, परतूर, जालना व घनसावंगी या चार तालुक्यातील जवळपास 300 गावातील नागरिक शेकडो वर्षांपासून परतुर तालुक्यातील गोळेगाव येथील गोदावरी नदीच्या तीरावर दशक्रिया विधी पार पाडत असतात. दशक्रिया विधीसाठी गोळेगाव तालुका परतुर येथील घाट हिंदू धर्मीयांचे श्रद्धास्थान असल्याने सदरील नदीवरील घाटात स्नान केल्याने पाप नष्ट होऊन पुण्य पदरात पडते अशी आख्यायिका असल्यामुळे सदरील ठिकाणी दररोज पंधरा ते वीस दशक्रिया विधी पार पडत असतात. सदरील ठिकाणी दशक्रिया विधी पार पाडण्याकरता विविध सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने घाट बांधणी करून दशक्रिया विधी करिता आवश्यक त्या सर्व सेवा उपलब्ध करून देण्याच्या करीता दहा कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याने विशेष बाब म्हणून सदरील निधी उपलब्ध करून द्यावा.