
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी नादेड( देगलूर); देगलूर शहरातील बंद अवस्थेत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याला मोतीबिंदू झाले काय असा प्रश्न शहरातील जनता करत आहे. वाहन चोरी ,अवैध धंदे ,अवैध्य वाळू वाहतूक ,घरफोडी इत्यादी गुन्हेगारीवर वचक बसविण्याकरिता हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. लोकसहभागातून शहरातील मुख्य रोडवरील विविध चौकातील सीसीटीव्ही लावण्यात आले होते त्याच थेट कनेक्शन शहरातील पोलीस स्टेशन ला जोडण्यात आले होते काही काळ हे सीसीटीव्ही सुरू होते त्याच परिणाम पण दिसून येत होता मात्र वारंवार देगलूर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक बदलत असल्याने याकडे संबंधित प्रशासान विभागाचे कमालीचे द्रुलक्ष झाले इतकेच नव्हे तर या मध्ये सीसीटीव्ही समोरील अवैध धंदे वाळू तस्करांचे वाहने गौण खनिज वाहन चोरी करणारे व अवैध दारू खेडोपाडी करनारे यांना सीसीटीव्ही फार अडचणीचे ठरत असल्याने अशा गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासाठी जाणून-बुजून प्रशासन सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करत नाही ना ? अशी कुठेतरी देगलूर शहरातील जनतेच्या मनात प्रश्न निर्माण होत असताना दिसत आहे. हे सीसीटीव्ही कॅमेरे शहरातील लोकसहभागातून लावले होते. सध्या हे सीसीटीव्ही शोचे वस्तू झाल्याच दिसून येत आहे विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाने याबाबतीत लक्ष दिले तर शहरातील सीसीटीव्ही सुरू होऊ शकतात. जर विविध राजकीय पक्षांच्या जबाबदार लोकप्रतिनिधी यांनी याबाबतीत लक्ष घातले तर हा महत्त्वाचा प्रश्न सहज सुटू शकतो पण याबाबतीत मात्र कुणीही राजकीय नेते याबाबतीत पुढाकार घेताना दिसून येत नाही. या बाबतीत देगलूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी चर्चा केली असता या विषयात त्यांचा उत्साह दिसून येत नव्हता या सीसीटीव्ही मुळे वाहन चोरणारी टोळी व अवैध धंदे करणाऱ्या वरे चांगली वचक बसली होती हे आवर्जून उल्लेख करावा लागेल. आता तरी प्रशासनाने जागे होऊन शहरातील सुरक्षेच्या संदर्भात देगलूर शहरातील चौकातील व मुख्य रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्ती करून चालू करावे अशी देगलूर शहरातील जनते मध्ये चर्चा होत असताना दिसत आहे…