
दैनिक चालु वार्ता
म्हसळा रायगड प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा :- बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्या सूचनेनुसार सुरवसे आणि मोरे यांची निवड करण्यात आली. बहुजन रयत परिषद महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ईश्वर क्षिरसागर व बहुजन रयत परिषद महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बालाजी गायकवाड यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले._*
*_बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी जुनी राज्यस्तरीय कार्यकारिणी बरखास्त करीत नव्या नियुक्त्या केल्या. यानुसार प्रदेशाध्यक्ष पदी ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांची नियुक्ती (दिनांक 3 सप्टेंबर) करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर ऍड. कोमलताई यांनी राज्यभरातील रिक्त जागांवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याच्या सूचना केल्या आहेत. यापार्श्वभूमीवर कर्मचारी संघटना, वृद्ध कलाकार, महिला कामगार संघटना, शिक्षक संघटना अशा वेगवेगळ्या माध्यमातून संघटनेचा विस्तार करण्यावर भर दिला जात आहे. यानुसार बहुजन रयत परिषद महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ईश्वर क्षिरसागर व बहुजन रयत परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बालाजी गायकवाड यांनी उमरगा येथील नियुक्त्या केल्या. यावेळी सुरवसे आणि मोरे यांनी एकनिष्ठतेची शपथही देण्यात आली. बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेसाठी प्रामाणिकपणे कार्यरत राहणार असल्याचे जगदीश सुरवसे आणि वैजनाथ मोरे यांनी सांगितले…