
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी नादेड (देगलूर ): देगलूर येथील शिक्षण विभागाच्या तालुक्यातील १२
केंद्रांतर्गत असलेल्या २३७ प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या अभिलेखे पडताळणीतून ३ हजार १२७ कुणबी असलेल्या नोंदी मिळाल्या आहेत. ही सर्व अभिलेखे १९७० च्या पूर्वीची असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, तदनंतर अनेकांनी शाळेच्या दाखल्यावर कुणबी नोंदच हटवल्याने अनेकांच्या दाखल्यावर मराठा हीच नोंद असल्याचे पुढे येत आहे.अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मनोज जरांडे पाटील यांनी गेल्या दहा दिवसापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या उपोषणाचे पडसाद राज्यस्तरावर उमटताच शासन खडबडून जागे झाले. तत्काळ प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व आस्थापनातून कुणबी असणाऱ्या दस्तऐवजांची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यासह तालुक्यातील शिक्षण व महसूल यंत्रणा झपाटून कामाला लागली आहे.
तत्कालीन गाव नमुना नंबर १४ हा दस्तऐवज म्हणजे महसूल प्रशासनाची एक नोंदवहीच असून त्यावर जन्ममृत्यूच्या नोंदी घेतल्या जात असत. यामध्ये नागरिकांच्या नावासमोर जातीचा उल्लेख राहत असे.
अनेक ठिकाणी सापडलेल्या या नमुना नंबर १४ मध्ये कुणबी जातीचा उल्लेख आढळलेला आहे. मात्र, येथील महसूल यंत्रणेत हे दस्तऐवजच उपलब्ध नसल्याने मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. तत्कालीन निजाम राजवटीत देगलूर वपरिसरातील अनेक तालुके हैदराबाद संस्थानात होती. तेव्हा हा परिसर सध्याच्या तेलंगणात असलेल्या मुधोळला जोडली होती.निजाम संस्थानातील दस्तऐवजाची पडताळणी
एका मंडळ अधिकाऱ्याच्या
करण्यासाठी नेतृत्वाखाली येथील महसूल यंत्रणेचे एक पथक मुधोळ (तेलंगणा) येथे पाठवण्यात आले असून ते तेथील अभिलेखांची पडताळणी करून अहवाल देणार आहेत. त्यानंतरच माहिती उपलब्ध होईल असे महसूल यंत्रणेकडून सांगण्यात आले.निजाम संस्थानात जन्म मृत्यूची नोंद, जातीचा उल्लेख नमुना नंबर १४ मध्ये घेतली जात असत मात्र अभिलेखे जतन करण्याचे काम त्यांच्याकडून झालेच नाही. त्यामुळे ते दस्तऐवज मिळणे अवघड मानले जात आहे.
याउलट जेथे इंग्रजांचे राज्य होते तेथे हे दस्तऐवज सुखरूप जतन करण्यात आले आहे. खरेदी विक्रीच्या दस्तऐवजांमध्ये उर्दू भाषेत काही दस्तऐवज आहेत मात्र त्यांची पडताळणी झाल्यानंतर त्यात काय उल्लेख आहे हे समोर येईल. देगलूर तालुक्यातील केंद्रनिहाय नोंदी…
पेठ अमरापूर केंद्र- ९८८ नोंदी, आलुर – १७८, वनाळी – ४९५, चैनपूर – ९७, नरंगल – ८७, भायेगाव – २३४, होट्टल – १३२, लोणी – ४१६, हाणेगाव – ८९, मानुर – १७४, माळेगाव – ११७, कावळगाव – ७०
सद्यस्थितीत शिक्षण विभागाकडून अभिलेखाच्या पडताळणीनंतर प्राप्त झालेल्या कुणबी नोंदीची माहिती संकलित करण्यात आली असून त्याचाअहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येईल. जुने अभिलेखे पडताळणीचे काम अद्याप सुरू आहे.
अशी माहिती राजाभाऊ कदम, तहसीलदार देगलूर. यांनी दिली.