
दैनिक चालु वार्ता
परंडा प्रतिनिधी धनंजय गोफणे
परंडा- परंडा येथील राजे शिवाजी पब्लिक स्कूल चे विद्यार्थी अतिशय सुंदर वेशभूषेत शाळेत आले होते जणू विद्यालयात गोकुळच अवतरले होते. यावेळी सर्व पालकांनी विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर वेशभूषेत शाळेत आणले होते. लहान लहान कृष्ण राधा अतिशय रम्य वातावरणात खेळत होते. यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी टिपरी नृत्य सादर केले तर मुलांनी दमदार डान्स सादर केला. LKG व UKG च्या वर्गातील मुलांनी दहीहंडी फोडली व आनंदी वातावरणात गोपाळकाला साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अनेक माताभगिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी काम केले.