
दै.चालु वार्ता
ता.प्रतिनिधी प्रवीण मुंडे
अमरावती (चिखलदरा) वझ्झर येथे गोकुळ अष्टमीच्या निमित्याने गवलान समाजाच्या वतीने दहीहंडी (दि.८) शुक्रवार रोजी आयोजित करण्यात आली होती.
या दहीहंडी उत्सवात आजू-बाजूच्या गावकऱ्यांसह स्थानिक नागरिक सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी गवलान समाजाचे डॉ.प्रवीण मुरले,उपेन भाऊ,नारायण बोरेकर (सरपंच),अनिल अकोले निमकुंड,सौ.छायाताई बारवे (सरपंच) आदी या दहीहंडी वेळी प्रमुख उपस्थित होते.तर लक्ष्मण सावरकर आणि डॉ.प्रवीण मुरले यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि त्यानंतर दहीहंडी गोविंदा पथकाद्वारे फोडण्यात आली.
या दहीहंडी कार्यक्रमावेळी गवलान समाज बांधव,मित्रमंडळी,मुख्याध्यापक नितनवरे आणि महत्वाचे विद्यार्थी व लहान मुले-मुलींनी सुद्धा दहीहंडी उत्सव बघण्यासाठी उपस्थिती दर्शविली.