
येणाऱ्या सण उत्सवात प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे; एम. बी. खेडकर…
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा/ सुरेश ज्ञा. दवणे..
जालना (मंठा):गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद या येणाऱ्या सणा निमित्त मंठा पोलीस ठाणे येथे ( दि .१३ ) बुधवार रोजी शांतता समीतीची बैठक आयोजीत करण्यात आली होती.
यावेळी बोलतांना पो. नि. मारूती खेडकर म्हणाले कि प्रत्येकाने कायद्द्याचे व नियमाचे पालन करून येणारे सण उत्सव शांततेत साजरे करावे.व सोशल मीडियाचा जपून करावा, मंठा शहरात अनेक वर्षापासून येथील सर्व जाती धर्माचे लोक कोणताही सण उत्सव,ईद, जयंती हे एकञीतपणे साजरे करतात आणी ही वर्षानुवर्ष चालत आलेली ऐक्याची परंपरा पुढे ही कायम राखत येणारे सण उत्सव एकञीतपणे साजरे करावे.व शेवटी बोलतांना म्हणाले कि कोणाही अनुचित प्रकार घडणार नाही याची खरबदारी घ्यावी नसता कोणाची गय केली जाणार नाही असे आव्हान पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले.
सर्व सण उत्सव एकञीतपणे कसे साजरे करायचे याच उदाहरण देतांना मंठा शहराच नाव घेतल जात आणी हिच परंपरा पुढे ही कायम राहिल असे जेष्ठ नागरिक सेक्रेटरी आली भाई कुरैशी यांनी यावेळी बोलतांना सांगीतले.प्रकाश मुळे यांनी मनोगत व्यक्त केले.
तहसीलदार रूपा चिञक बोलतांना म्हणाल्या कि मंठा वासियांनी नेहमीच एकतेचा संदेश देत प्रत्येक सण उत्सव येथील सर्व समाज बांधव हे एकञीतपणे साजरे करतात हे मंठा वासियांसाठी अभिमानाची गोस्ट असुन ही परंपरा कायम चालु ठेऊन येणारे सन उत्सवाला गालबोट न लागता आनंदात साजरे करा असे आव्हाण केले यावेळी पोलीस पाटील,शांतता समितीचे पदाधिकारी,
माजी उपनगराध्यक्ष बालासाहेब बोराडे,नगरपंचायत कार्यालय अधीक्षक सुधाकर खैरे, सहाय्यक अभियंता भावसार, पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत, पोलीस कर्मचारी, शांतता समितीचे पदाधिकारी,प्रतिष्ठित नागरिक,पोलीस पाटील यांची उपस्थिती होती.