
अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंखे
( सातारा जिल्हा ) पुसेसावळी येथे एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती सदर पोस्ट वरुन परिसरांतील लोकांचा गैरसमज होवून कायदा व सुव्यवस्था प्रश्न चांगलाच निर्माण झाला होता. सदर ठिकाणी तात्काळ सातारा जिल्हा पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन सदर ठिकाणची परिस्थिती आटोक्यांत आणली. सध्या पुसेसावळी व परिसरांत कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिलेला नाही. सध्या घटनेच्या अनुषंगाने सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. जिल्ह्यात सध्या व्हाट्सअप ग्रुपवरती तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे वाढत चाललेल्या तणावांच्या पार्श्वभूमींवर सध्या सातारा जिल्हा पोलीस दल अलर्ट मोडवर आले आहे. सोशल मीडियावर आता सातारा पोलिसांची करडी नजर असणार आहे. कोणीही समाजात तेढ निर्माण होणारी पोस्ट वायरल केल्यास अथवा फॉरवर्ड केल्यांस थेट गुन्हे दाखल करणार असा इशारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी दिला आहे. सोशल मीडियावर सध्या महत्वांचे समाजमाध्यम झाले आहे. परंतु सोशल मीडियावर पोस्ट टाकताना अनेक जण काळजी घेत नाहीत आलेल्या पोस्ट पुढे फॉरवर्ड करण्यांचे काम चांगलेच करतात… परंतु हे करताना आता काळजी घ्या अन्यथा एखादी पोस्ट तुम्हांला चांगलीच महागात पडणार आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर सातारा जिल्हा पोलिसांची करडी नजर असणार आहे. त्यामुळे आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या वर पोलिसांकडून थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्या पोस्टद्वारे धार्मिंक आणि सामाजिक तेढ निर्माण झाल्यांस तुम्हांला कारागृहाची हवा देखील खावी लागणार आहे. त्यामुळे आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांना तीन वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा देखील होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व व्हाट्सअप ग्रुपचे ॲडमीन धारकांनी आपल्या सदस्यांना सूचना कराव्यात तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वांस ठेवू नये असे देखील आवाहन सातारा पोलिसांकडून करण्यात आले आहे…